या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

१०८

बोवांची ' परशुराम क्षेत्रास ' गठडी वळली. कोंकणवास विष्णुशास्त्र्यांना पराकाष्ठेचा दु:सह होऊन रजिसेवा खिलांतून आपला पाय काढून घेण्या- विषय त्यांचा निश्चय झाला. १८७८ त कृष्णशास्त्री वारले. १८७९ च्या एप्रिलांत विष्णुशास्त्री चाकरी सोडण्याच्या बेतानें आपलें चंबूगबाळें आटोपून पुण्यास आले. चारपांच महिने काय करावें, कोणता धंदा काढावा अशा विचारांत गेले. या सुमारास डेक्कन कॉलेजांतील दोनतीन गृहस्थांचा सरकारी नोकरी न करितां स्वतंत्रपणें लोकोपयोगी एखादें काम करण्याचा निश्चय झाला. नोकरी सोडून गांवांत शास्त्रीबोवा येऊन बसले आहेत असें कळल्या- बरोबर सदहू मंडळी त्यांस जाऊन भेटली, व उभयतांच्या विचारें एक शाळा काढण्याचा विचार झाला; त्याप्रमाणें १८८० च्या जानेवारी महि- न्यांत 'न्यू इंग्लिश स्कूल' या नांवानें मोरोबादादा फडणीस यांच्या वाड्यांत शाळा घातली; ती आतां कोणत्या स्थितीत आहे हें सांगायला पाहिजे असें नाहीं. शाळेस पुरें वर्ष झालें न झालें तो तिला आणखी एक दोन गृहस्थ येऊन मिळाले. पांचसहा मंडळी एका हेतूनें व एका मतानें वागत असल्या- मुळे शाळेचें काम आटोपून आणखीही कांहीं करितां येईल असे वाटल्या - वरून शुद्ध इंग्रजी आणि शुद्ध मराठी अशीं दोन वर्तमानपत्रे काढण्याचा विचार झाला, व त्याप्रमाणे ८१ च्या जानेवारीत मराठा व केसरी हे बाहेर आले. या दोघांनी मिळून एका वर्षात महाराष्ट्र देशांत केवढी चळवळ करून सोडिली आहे, याचा वाचकांनींच विचार करावा. याखेरीज शास्त्री- बोवांचे खासगी धंदे जोरानें चालले होते. निबंधमाला, किताबखाना, चित्रशाळा वगैरे गोष्टी नेटाने चालल्याच होत्या. येर्णेप्रमाणे शास्त्रीबोवा ज्या उद्योगांत व्यग्र असत त्यांची थोडीशी हकीकत झाली. शास्त्रीबोवांचे बहुतेक विचार त्यांच्या मार्लेतून आणि केसरीतून प्रसिद्ध आहेत, तेव्हां त्यांसंबंधानें विशेष लिहावयाचें आहे असें नाहीं. पण ज्या गोष्टी अतिशय भिडस्त स्वभावामुळे शास्त्रीबोवा जिवलग मित्रांबरोबर कधीही काढीत नसत, त्यां- संबंधाने येथे दोन शब्द लिहिण्याचा हेतु आहे.

 आपल्या देशाचें पारतंत्र्य आणि दारिद्रय ह्रीं शास्त्रीबोवांच्या अंतःकर- णाला जशीं खात तसें दुसरें कांहीं खात नसे. आपल्या लोकांची दैन्यावस्था पाहून त्यांचा जीव तिळतिळ तुटे, पारतंत्र्याला ज्ञान आणि दारिद्रयाला उद्योग