या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०९

कै. विष्णु कृष्ण चिपळोणकर

हीच वस्ताद औषधें असें ते नेहमी म्हणत, लोकांना खरें ऐहिक सुख होण्याला "त्यांची राज्यव्यवस्था कशी पाहिजे याचा विचार त्यांच्या मनांत नेहमीं घोळत असे. लोकांत विद्याप्रसार होऊन त्यांना राजकारणांतील तत्त्वें कळावीं व तद- नुसार त्यांनी वर्तन ठेवून या हतभाग्य भरतखंडास त्यांनी एकदां तरी सुदिन आणावा ही त्यांची बळकट इच्छा असे. परकीय लोक राज्य करीत असल्या- मुळे आमचे लोक सत्त्वहीन होत जाऊन अप्पलपोटे, भेकड, हांजी - हांजीखोर, मह, निर्लज्ज, अभिमानशून्य असे झालेले पाहून त्यांच्या अंगाचा तिळपापड होई. परकीय या नात्याने इंग्रजांचा त्यांना अत्यंत कंटाळा असे, पण त्यांची करामत, दृढता, कौशल्य आणि उद्योग हीं पाहून त्यांस त्याचें पराकाष्ठेचें आश्चर्य वाटत असे. हिंदुलोकांचा, हिंदु- धर्माचा, हिंदुरिवाजांचा, सारांश ज्याला ज्याला म्हणून 'हिंदु ' हें विशेषण लावितां येईल त्याचा त्यांना मोठा अभिमान असे. सर्वोपेक्षां मराठी भाषेवर त्यांचें जें प्रेम असे तें कांहीं पुसूच नये. एकसारखीं सात वर्षे तिची उपासना करून त्यांनी तिला अगर्दी भारून टाकल्यासारखें केलें होतें. ज्याप्रमाणें प्रख्यात फ्रेंच ग्रंथकर्ता, व्होल्टेर यानें एकदां कोरडा उचलला म्हणजे स्टकहोम व रोम, आणि पीतर्सबर्ग व लिस्बन यांच्या दरम्यान चटसारी मंडळी चळचळ कांपत असे, त्याप्रमाणें शास्त्रीबोवांनी लेखणी उचलली कीं रावसाहेब, रावबहादुरें, रेवरंडे, सरस्वती-यांची पाचावर धारण बसे. आपल्या मार्गे आपले नांव चालविण्यास त्यांनी एक सप्तसंवत्सरा निबंधमाला कन्येखेरीज दुसरें कांहीं ठेविलें नाहीं. त्यांच्या त्या गद्य कृतीला स्फुरत्कलालापविलास कोमला हें बाण कवीचें वर्णन हुबेहुब लागते. कोणी एकदां शास्त्रीबोवांना असा प्रश्न केला होता कीं असे कडक लेख लिहिण्यास तुम्ही कसे धजतां ? त्यावर त्यांनी असें उत्तर केलें कीं अगोदर । तुरुंगांत एक पाय ठेवून मग आम्ही देशोन्नतीसाठी आपली लेखणी हातीं । घेतली. एखाद्या वेळेस त्यांचा कल्पनाविहंग पूर्ण पंख पसरून भराया। मारूं लागला म्हणजे त्याला हिंदुस्थान देश स्वतंत्र होऊन प्रजासत्ताक राज्याखाली सुखाने नांदत आहे असें दिसे. पुनर्विवाह, बालविवाह, स्त्री- शिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, धर्मसंस्थापना, जातिभेद यासंबंधानें त्यांचे विचार' जुन्या मताचे दिसत, परंतु ते वास्तविक रीतीनें अगर्दी पुढे सरसावलेल्या
८" " ་