या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुलामांचें राष्ट्र

१३

 ( राष्ट्राचं ऐक्य होण्यास लागणारा एक तरी गुण आम्हांत भरपूर आहे काय ? धैर्य नाहीं; उत्साह नाहीं; बल नाहीं; ज्ञान नाहीं; तर्क नाहीं; उद्योग नाहीं; कला नाहीं; खरा देशाभिमान नाहीं; खरी धर्मश्रद्धा नाहीः खरै बोलण्याची किंवा खरें आचरण करण्याची संवय नाहीं; सारांश, चांगलें असें कांहीं नाहीं. ज्याची त्याची अहोरात्र वर्तमान क्षुद्र स्वार्थावर दृष्टि लागली असल्यामुळे आपल्या विचाराचा व आचाराचा भावी संततीवर काय परिणाम होणार याचा कोणीही फारसा विचार करीत नाही. उदा- हरणार्थ, अलीकडील राष्ट्रसभेची चळवळ घ्या. ही चळवळ आम्हांस सर्व- थैव कल्याणकारक व्हावी अशी तिची योजना केली आहे. कोणालाहि उघडपणें या चळवळींत जाऊन मिळण्यास हरकत नाहीं. असें असून ती - विषय केवढी हेळसांड ती पहा ! अगदी खालच्या प्रतीच्या लोकांनी अजून तिचें नांवही ऐकलें नसेल. तेव्हां त्याच्याकडून तिला द्रव्यद्वारां मदत होण्याची अपेक्षा करणें म्हणजे दुधाच्या आशेनं पारड्या गाईचे आंचळ ओढीत बसण्यासारखें होय ! जे मध्यम प्रतीचे लोक आहेत, व ज्यांना या संस्थेचें महत्त्व समजत आहे, ते देखील हिला हवी तेवढी मदत करीत नाहींत हें आश्चर्यं नव्हे काय ? ह्यांच्या कांसा शुष्क नाहीत; पण राष्ट्रसभा हें आपलें वासरूं आहे, असें यांस वाटते नसल्यामुळे हे आपल्या कांसेला त्यांस बिल- कूल तोंड लावू देत नाहींत ! पण याहीपेक्षां विशेष चमत्कार विस्मय वाटण्यासारखी गोष्ट ही कीं, ज्या हयूमसाहेबाने ही राष्ट्रसभा अस्तित्वांत आणिली, आणि आपलें सामर्थ्य सर्वस्व खर्च करून तिचें हरएक प्रकारें आज सात वर्षे संरक्षण केलें, त्यावर त्याच्या जातभाईनी राजद्रोहाचा बडगा उचलतांच आमच्यांतले शहाणेसुर्ते म्हणविणारे कांहीं लोकही त्यावर तुटून पडूं लागले ! खासा न्याय ! खास धैर्य ! खाशी देशभक्ति ! हिंदुस्तानच्या काळचें उत्पन्न सुमारें वीस कोटी रुपये आहे, व तेवढाच लष्करी खात्याचा खर्च आहे. हिंदुस्थानच्या सैन्याइतकें महागड़ें सैन्य दुसऱ्या कोणत्याही