या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११५

गुलामांचे राष्ट्र

सारखं झालें आहे, असें बरळणें हा केवढा प्रमाद व कृतघ्नपणा होय ? चार साहेब लोकांकडून बरें म्हणवून घेण्यासाठीं हिंदुस्थानच्या व इंग्लंडच्या खऱ्या हितचिंतकांवर अशा रीतीनें उलटून पडणें हें आम्हां भेकड, लोभी, अविचारी, व स्वार्थी हिंदु लोकांशिवाय दुसऱ्या कोणाच्यानेही होण्यासारखें कर्म नाहीं. ज्यांनीं हमसाहेबांस भ्रमिष्ट ठरविले आहे त्यांनाच तसें ठरविणें विशेष उचित होणार आहे ! हमसाहेबांसारखी आमची आम्हांस कळकळ असती तर राजद्रोहाचा किंवा दुसरा कसलाही आरोप आपणावर आणून घेण्यास त्र त्याचे परिणाम साहण्यास आम्ही तयार झालों असतो. हयूम- साहेबांस बेवकूफ ठरविणाऱ्या या वृद्ध शहाण्यांना येवढें तरी समजावयाला पाहिजे होतें की ह्यूमसाहेबांस अगोदर फांशी चढविल्याशिवाय फासा पदर आपल्या गळ्याभोवती बसण्याचा संभव नाहीं. पण इतके धैर्य आमच्या अंगी असतें तर आमची सांप्रत दास्यावस्था आम्हांस कोठून आली असती? कोणताही नवीन प्रघात रूढ होण्यापूर्वी त्याला तीन पहाऱ्यांतून जावें लागते. पहिला पहारा मनाचा, दुसरा वाणीचा, आणि तिसरा आचरणाचा. यांपैकी प्रत्येक पायांतून जात असतां त्याला मज्जाव ' झाल्याखेरीज राहत नाहीं ! लोकोत्तर पुरुषाची गोष्ट एकीकडे राहू द्या; शेंकडा नव्याण्णव लोकांस नवीन कल्पना सुचत नाहीं, व सुचली तरी तिला डोक्यांत थारा द्यावा, असें त्यांस वाटत नाहीं. सामान्य मनुष्याचें डोकें पूर्वापार चालत आलेल्या व लहानपणापासून अनेक द्वारांनी संपादिलेल्या साधारण कल्पनांनी ठिक्की सारखें गच्च भरून गेलेलें असतें. त्यांत एखादी नवीन कल्पना शिरू देण्यास त्याला अतिशय प्रयास पडतात खचून भरलेल्या व सुतळीनें तोंड शिवलेल्या पोत्यांचे दोन तीन टांके तोडून त्यांतील पायली दोन पायली धान्य बाहेर काढल्याशिवाय ज्याप्रमाणें त्यांत नवीन धान्य सांठविणें शक्य नसतें, त्याप्रमाणें वेड्यावाकड्या विचारांनीं ज्याच्या मनांतील तिळ नू तिळ जागा व्यापून टाकली आहे, त्याच्या मनांतील वतनदार होऊन बसलेल्या कांहीं विचारांस हुसकून लावल्याशिवाय तेथें नवीन विचारांची डाळ मुळींच शिजत नाहीं ! कोणतीही गोष्ट आचारांत आणण्यापूर्वी किंवा तिजविषयीं लोकांत चर्चा सुरू करण्यापूर्वी ती चांगली आहे, अशी ज्याच्या त्याच्या मनांत पक्की खातरी झाली पाहिजे. मनुष्य एकांतांत बसला आहे, स्वच्छ