या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
अथवा दहापांच लोकांनी पांचचार बायका ठेवण्यास किंवा करण्यास प्रत्य- वाय कां असावा; जेवढ रोगी व कुरूप मुलें अस्तित्वांत येतील तेवढीं एक दम मारून टाकण्याबद्दल कायदा कां नसावा; ज्या रोग्यांचे रोग वैद्यांच्या मतानें असाध्य ठरतील, व ज्या रोग्यांचें जीवित रोगांच्या असह्य यातनांमुळें अत्यंत कष्टमय झालें आहे, अशांस विष किंवा गोळी घालून यातनामुक्त कां करूं नये; रक्तपितीच्या रोग्यासारखे रोगी मोठ्या नदीत किंवा समुद्रांत बुडवून त्या रोगाचा बीमोड करण्यास काय हरकत आहे; पाहिजे त्याला पाहिजे त्या स्त्रीशीं समागम करण्याची परवानगी दिल्यास काय परिणाम घडतील; व्यक्तीचा अथवा कुटुंबाचा संपत्तीवरील हक्क नाहींसा करून देशांतील साऱ्या संपत्तीचे सारे लोक समाईक मालक कां न मानावे; आळी- पाळीनें सान्यांस साया तऱ्हेचीं कामें करण्यास लावून उच्चनीचत्वाचा भाव मोडून टाकण्याचा प्रयत्न कां करूं नये; लोकसत्ताक राज्यपद्धतीशिवाय इतर प्रकारच्या राज्यपद्धति नाहींशा करण्यास काय हरकत आहे; वगैरे प्रश्नांचा आपापल्या मनाशीं शांतपणानें विचार करण्याची गोष्ट तर राहूंच द्या, पण असले प्रश्न कानावर पडल्याबरोबर ज्याचें धायें गडबडणार नाहीं, व हे ऐकल्यानें आपल्या हातून मोठें पाप घडलें असें ज्यांस वाटणार नाहीं, असे किती लोक सांपडणार आहेत ? तथापि एका कालीं वैभवाच्या शिख- राम चढलेल्या युरोपांतील कित्येक देशांतल्या तत्त्ववेत्त्यांनी, मनुष्यानें आपल्या आईशीं किंवा सख्या बहिणीशी लग्न करण्यास काय हरकत आहे किंवा ज्याला त्याला लग्न करण्याची व संतति वाढविण्याची सदर परवानगी असण्या- पेक्षां ज्याप्रमाणें जातिवंत घोडे उत्पन्न करण्यास आपण विशेष प्रकारची व्यवस्था करतो, त्याप्रमाणें सुदृढ व सुरूप मनुष्य उत्पन्न करण्यासाठी मनुष्य- पोळ संस्थानच्या खर्चानें कां ठेवू नयेत, अशाहि प्रश्नांचा यथास्थितपणें विचार केला आहे इतकेंच नाहीं, तर त्या प्रश्नांस त्या तत्त्ववेत्त्यांनीं जीं उत्तरें दिल आहेत त्यांच्या अनुरोधानें त्या देशांतील राज्यकर्त्यांनीं अनेक विलक्षण संस्था स्थापून त्या देशाच्या विचारावर, नीतीवर, वर्तनावर व इतिहासावर आश्चर्यकारक परिणाम घडवून आणिला. युरोप खंडांतील जुन्या ग्रीक लोकां- सारखे लोक या पृथ्वीतलावर पुनः अवतरतील किंवा नाहीं याची बरीच शंका आहे. या अद्भुत लोकांनी आपल्या विचारविहंगमांस पाहिजे तेवढ्या