या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळजापर्यंत पोहोंचलेली जखम

१४

 आमच्या राज्यकर्त्यांस आमच्याच फायद्याकडे लक्ष द्यावयाचें असतें तर गोष्ट निराळी होती. पुष्कळदां आमच्या फायद्यापेक्षां त्यांना आपल्या देशा- च्या व देशबांधवांच्या फायद्याकडे विशेष नजर पुरविणें भाग पडतें ! त्यांनी असें करावें हें अत्यंत स्वाभाविक आहे. पण व्यापारदृष्टीने पाहतां इंग्लिश लोकांचा जो फायदा तो आमचाही फायदा असणें स्वाभाविक नाहीं. जें काम आमचें आम्हांस करतां येण्यासारखें आहे तें आमचें आम्ही न करतां स्वस्थ बसलों आणि तें दुसऱ्याकडून करून घेतलें, तर त्याबद्दल दुसन्यास जें वेतन, रोजमुरा किंवा किंमत द्यावी लागेल तिच्या मानानें आमचें नुकसान होणार आहे. या किंमतीबद्दल आम्हांस विश्रांति मिळेल ही गोष्ट खरी. पण पोट भरलेले असले तरच विश्रांति सुखावह होते. लहान मुलांस भूक लागली असतां ती रडत उठतात हें सर्वास ठाऊक आहेच; व या गोष्टींत लहान मुलांप्रमाणेच थोरांचीही स्थिति आहे. पोटांत कावळे कोरूं लागले असतां स्वस्थ बसण्यापासून सुख कसें होणार ? मुकेच्या यातनेपेक्षां कामाचे श्रम सहज साइण्यासारखे आहेत. इंग्लिश लोकांनी आमचा व्यापारधंदा आटोपल्यामुळे निरुद्योगापासून होणारे हाल आम्हांस सोसावे लागत आहेत. यावर कोणी असा प्रश्न विचारतील कीं, इंग्लिश लोकांस तुम्हीं आपले धंदे नाहीसे करूं का दिलेत ? याचे उत्तर एवढेच आहे कीं, ज्या कारणांमुळे आम्ही आपले राज्य त्यांना घेऊं दिलें त्याच कारणामुळे आम्ही आपले धंदेही आटोपूं दिले ! आणि राज्य परत मिळविण्यासाठी ज्या प्रकारच्या खटपटींचा उपक्रम आम्ही केला आहे त्याच प्रकारच्या खटपटी व्यापारधंदा फिरून हाती येण्यासाठीही चालविल्या आहेत. एक दुसन्याशी संलग्न आहे; तेव्हां साध्य होणार असतील तर दोन्ही एकाच क्रमानें साध्य होत जातील ! भेद इतकाच आहे कीं, व्यापारधंद्याच्या संबंधाने आम्हांस आमच्या सरकारशीं विशेष राजरोसपणानें भांडतां येतें. ( तथापि हें भांडण घालीत असतां ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे कीं, आधिभौतिकदृष्ट्या इंग्रज लोकांस हिंदु-
८ आ.