या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १२४
आहे ! आमच्या व्यापारास व शेतकीस अर्थशास्त्रांचें उल्लंघन न करतां कोणत्या रीतीने मदत करतां येईल याची चिकित्सा मि. जस्टिस तेलंग, रा. ब. रानडे, दादाभाई नवरोजी वगैरे अनेक अनुभविक शास्त्रज्ञ विचारी गृहस्थांनीं केली आहे. तिचा काय उपयोग ? निजलेल्यास जागे करणे शक्य आहे; जाग्यास जागे कोण करूं शकेल ? इंग्लिश लोकांच्या मनोधर्मेति एका- एक प्रचंड क्रांति झाल्याशिवाय त्यांच्या अंतःकरणांत जपान किंवा युनाय- टेड स्टेट्स येथील सरकारप्रमाणें आमच्या व्यापारवृद्धीविषयीं कळकळ उत्पन्न होईल अशी आशा करणें व्यर्थ आहे.