या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १२६
येथेंच चूक होते. हैं आमचें म्हणणें सकृत्दर्शनीं चमत्कारिकसें भासेल, व तें तसें भासावें यांत नवल नाही. कारण कीं आजपर्यंतचे जगाचे सर्व व्यवहार नफातोट्यावर दृष्टि देऊनच झाले आहेत, हल्लाही होत आहेत, व पुढेही होत राहतील, याविषयीं आम्हांसही शंका नाहीं. मग असे असून, येथेंच चूक होते, असें आम्ही कसें म्हणतों, अशी पृच्छा सहज होणारी आहे, व त्याचे उत्तर देण्याच्या ऐवजी आम्हीही वाचकांस उलट कांहीं प्रश्न करतों, व त्याचें जें उत्तर तेंच वरील प्रश्नाचे उत्तर होय. धर्म या सदरा- खालीं ज्या शेंकडों बऱ्यावाईट गोष्टी आपण करतों, त्यांपैकी बहुतेक फाय- द्याच्या दृष्टीनेच आपण करतो. अमुक झाल्यास अमुक करीन, तमुक करीन अशा अटीवरच शेकडा नण्याण्णव धर्माचार होत असतात हे आपणा सर्वांस माहीत आहेच. बायकांचं वपन कां करावें ? तर त्यांच्या कबरीबंधानें नव- प्यास बांधले जाऊं नये म्हणून. ऋतुप्राप्तीपूर्वीच कन्येचा विवाह कां केला पाहिजे ? तर आपल्या ४२ कुळ्या नरकांत जाऊं नयेत म्हणून. सती कां जावें ? तर तसें केल्यानें अनंत कालपर्यंत स्वर्गसुख मिळेल म्हणून. तात्पर्य, कांहीं ना कांहीं फायदा होईल अशी खरी किंवा खोटी समजूत झाल्यावांचून तो तो मनुष्य तें तें धर्माचरण करीत नाहीं. परंतु असे असूनही निष्काम . भक्तीचा महिमा अधिक कां वर्णिला जावा ? या प्रश्नाचे उत्तर ज्यास देतां येईल, त्यास आमच्याही म्हणण्याचा अर्थ समजेल. अमुक गोष्ट कां केली पाहिजे, तर तें माझें कर्तव्य आहे म्हणून, व अमुक गोष्ट कां केली पाहिजे, तर त्यापासून मला फायदा होतो म्हणून. या दोन गोष्टींत फारच मोठा भेद आहे. आपले कर्तव्य समजून एखादी गोष्ट करणारा मनुष्य जसा नेटानें व निश्चयानें ती करतो, तसा फायद्यावरच नजर देणारा मनुष्य करूं शकणार नाही.
 वरील गोष्टी आतां आपण लोकांस प्रिय असणाऱ्या राजकीय सुधारणे- सच लावून पाहूं. कायदे कौन्सिलांत लोकनियुक्त सभासद असले पाहिजेत असे राष्ट्रीय सभेचे चालकही म्हणतात, व इतर सर्व लोकही म्हणतात. परंतु या दोघांची दृष्टि अगदी वेगळी आहे (ज्या कायद्यांचा अम्मल अमुक एक लोकसमुदायावर होत असेल, ते कायदे करणें हा केवळ त्याच लोक- समुदायाचा हक्क आहे; ते करण्याचा दुसऱ्या कोणासही अधिकार नाहीं,