या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३१ आणखी एक शहाण्याचा कांदा
हिंदू व मुसलमान गवय्ये आणि नायकिणी ज्या चिजा गातात किंवा वाज- वितात त्यांवरून हिंदू नीतीचें प्रमाण बांधितां येणार नाहीं. पण असें कर- ण्याचें धाडस आमच्या आजच्या निबंधाच्या नायकानें केलें आहे. अनेक चिजांच्या अर्थाचें मंथन केल्यावर आमच्या संगीतांत बहुधा ज्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो असें त्याच्या नजरेस आले, त्या ह्या होत-
 १ अनुकूल होण्याविषयीं वल्लभाची प्रार्थना.
 २ वल्लभाच्या विरहामुळे कामिनीस होणारा शोक.
 ३ प्रतिस्पर्धिनी कामिनीविषय द्वेषोद्गार.
 ४ सासू, नणंदा किंवा जावा यांचा डोळा चुकवून प्राणेशाची मुला- खत घेण्याची पंचाईत, व मेखलांतील क्षुद्रघंटांच्या आवाजामुळे कोणास समजूं न देतां घरांतून बाहेर पडण्याची, किंवा रस्त्यांतून जाण्यायेण्याची अडचण.
 ५ दयितावर ठेवलेल्या प्रेमास सासू व नणंदा यांकडून होणाऱ्या प्रत्यूहाच्या संबंधानें कामिनीचे दुःखोद्गार.
 ६ सखीपाशीं हितगुजाच्या गोष्टींचें कथन, आणि इष्ट मनोरथ पूर्ण कर- याच्या काम तिनें साहाय्य करावें यासाठी तिची विनवणी.
 ७ संकेत चुकूं न देण्याविषयीं व प्रेमबंध शिथिल न होऊं देण्याविषयीं सख्यांचा उपदेश.
 याप्रमाणें हिंदुस्थानांतील नायकिणींच्या तोंडी असलेल्या चिजांच्या अर्था- वरून आमच्या बायकांस कामातुर ठरविल्यावर त्या इतक्या कामातुर कशा- मुळें होतात, याचा छडा काढण्याकडे वुईलर्ड साहेब वळले, व त्या  कामि- त्वाची त्यांनीं जीं तीन कारणे शोधून काढलीं तीं हीं - १ हिंदुस्थानांतील पूर्वीची अनवस्था; २ अनेक बायका करण्याची चाल; व ३ हिंदु स्त्रियांचें अज्ञान या तीन कारणांमुळे पूर्वी हिंदू स्त्रिया कामातुर होऊन व्यभिचार करण्यास प्रवृत्त होत, असें वुईलर्ड साहेबांचें म्हणणें आहे !
हिंदुस्थानांत प्राचीन काळीं प्रवास करण्यासाठी घर सोडून गेलेल्या तरु- णांच्या तरुण पल्ल्या चिंतेनें व विहरव्यथेनें व्याकुळ होत्सात्या मोठ्या कष्टानें आपले दिवस कंठीत. त्यांच्या नणंदा व जावा सकाळी उठून वेणीफणी करीत आहेत, दागदागिने घालीत आहेत, व एकमेकींना विनोद करीत आहेत