या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विविध विचार

१७

१. सुधारक सत्याग्रही असतो.

 ब्राम्हणेतरांच्या हातचा चहा पिण्यास आम्हांस दोष वाटत नाहीं; तर आमच्या नीच मानलेल्या महारांची स्थिति सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्म- णांची एक पंगत झालेली जर आम्हांस पाहतां येती, तर आम्ही मोठे कृतार्थ मानलें असतें, ही गोष्ट आमच्या देशबांधवांपासून आम्ही चोरून ठेवीत नाहीं. परंतु आमच्यांतील जातिभेद नाहींसा व्हावा अशी जरी आमची मनापासून इच्छा असली तथापि ख्रिस्ती लोकांशी कारणावांचून आम्हीं कां संसर्ग ठेवावा हैं आम्हांस कळत नाहीं. म्हणून यापुढे तरी अशा अनावश्यक गोष्टी आमच्या सुशिक्षित लोकांच्या हातून घडणार नाहींत अशी आम्ही आशा करतों. सरते- शेवटी आमच्या धर्माभिमान्यांच्या कानांत एक गोष्ट सांगून या चहाप्रकर- णाची आम्ही समाप्ति करतों. सुधारकांस जातींतून हुसकून टाकावें म्हणजे त्यांची पीडा टळेल, असा जर हीं ग्रामण्यें काढण्यांत तुमचा हेतु असेल तर तो सफळ होणार नाहीं, ही तुम्ही खूण बांधून ठेवा. सुधारकांचे प्रयत्न केवळ त्यांच्या सुखापुरते असते तर तुम्हांपासून वेगळे होण्यास तुमच्या ग्राम- ण्याची त्यांनीं वाटच पाहिली नसती. परंतु समाजसुधारणा ही त्यांस स्वतःच्या सोईहून अधिक महत्त्वाची वाटत असल्यामुळे तुम्हांस सोडल्यावर त्यांनीं सुधारणा करावी तरी कोणाची ? तेव्हां होता होईल तो तुमच्या शिव्या, शाप व जुलूम यांस न भितां तुमच्या डोक्यांत प्रकाश पाडण्याचा ते प्रयत्न कर- तील. परंतु तुम्ही हट्ट धरून त्यांस जातींतून काढू लागल्यास ते वाटेल तें करतील पण तुमचा पिच्छा सोडणार नाहींत. तुम्ही त्यांचा कितीहि द्वेष करा, त्यांस कितीहि झिटकारा, पण फिरून ते येऊन तुम्हास चिकटलेले आहेत असें तुमच्या दृष्टीस पडेल. त्यांची मगरमिठी ज्यास उकलतां येईल असें कोणतेंहि ग्रामण्य तुमच्याच्याने बसवितां येणार नाहीं. त्यांच्या तुम्हांवरील भक्तीस पाहिजे तर विरोधभक्ति म्हणा, पण तिचें तुमच्यानें सत्त्वहरण