या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
आहे ती स्थितीच उत्तम आहे, व तींत फेरफार करण्याचा प्रयत्न करणे हाच प्रमाद होय, असे आम्हांपैकी पुष्कळांस वाटत असल्यामुळे जे थोडे वेडेपीर सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या छंदास लागले आहेत, ते समाजांत निष्का- रण असंतोष व कलह उत्पन्न करून, स्वतःस कांहीं फायदा नसतां अप्रिय करून घेत आहेत ! हे असे न करतील तर सर्वांस इष्ट अशा ज्या राजकीय, व्यापारीय, शिक्षणीय व इतर सामान्य सुधारणा, त्या एकमतानें करण्यास पुष्कळांची प्रवृत्ति होणार आहे. सामाजिक व धार्मिक गोष्टींविषयीं तंटे उपस्थित केल्यामुळें, राजकीय गोष्टींत एकदिलाने वागणे दुरापास्त झाले आहे.
प्रकारच्या आक्षेपकांस आम्ही असा प्रश्न करतों कीं, इंग्रज tatait तुम्हांस जिंकिलें त्यावेळेस तुम्हांत कोणत्याही प्रकारचे सामाजिक किंवा धार्मिक तंटे नव्हते. त्या वेळेस राजकीय सत्ता तुमच्या हाती असून सामाजिक व धार्मिक प्रकरणांत तुमचें पूर्ण ऐकमत्य असे असून इत्यादि परशत्रूस तुम्ही हार कां गेलां ? सैन्यबल, द्रव्यवल, संख्या यशाची बाह्योपकरणें तुमच्या हाती असून, व धार्मिक आणि सामाजिक गोष्टींत तुम्हांत द्वैत माजलेलें नसून, तुमची अशी दाणादाण कां झाली व पंचवीसचाळीस वर्षांच्या आंत तुम्ही इतके वीर्यहीन कसे झालांत ? आम्हांस असें वाटतें कीं, पेशवाईचा जो मोड झाला तो आमची सामाजिक धार्मिक स्थिति जशी पाहिजे होती तशी नव्हती म्हणून झाला. आणि येथून पुढेंहि आम्हांस सुदशा प्राप्त होण्यास व ती कायम राहाण्यास, आम्ही आपली गृहस्थिति व धर्माचार सुधारण्याचा प्रयत्न प्रथम केला पाहिजे व तो करण्यास अत्यंत अनुकूल काल सांप्रत आला आहे. चांगली राजकीय स्थिति ही चांगल्या गृहस्थितीचे व धर्मपद्धतीचें फळ आहे. सबब या दोहोंच्या सुधारणेस प्रथम लागलें पाहिजे.

XXX
१०. फुंकरांनी भडकणारी ज्वाला


 ज्याप्रमाणें कालाचा क्रम थांबविणें अशक्य आहे, त्याप्रमाणेंच मनुष्याच्या स्थित्यंतरास खळ पाडणें अशक्य आहे, तथापि हें सत्य अज्ञ लोकांच्या