या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विविध विचार

१२. कैद्याविषयींचे समाजाचे कर्तव्य

 तुरुंगांत येणारे सर्वच कैदी चोरी, खून, खोटे कागद, विश्वासघात यां- सारखे वाईट गुन्हे करून आलेले असतात असें नाहीं. एकादे वेळेस निरप- राधी मनुष्याला शुष्क कारणावरून किंवा गुन्ह्याच्या संशयावरून तुरुंगांत जावें लागतें. वास्तविक पाहिलें तर शेंकड़ा तीस कैदी मात्र खरोखर गुन्हे- गार सांपडतील, बाकीच्या दोन तृतीयांशांत विलक्षण प्रकारची भेसळ असते. कित्येकांना बाहेर पोटाला मिळत नाहीं म्हणून ते कोणाची कांहीं तरी कुरा- पत काढून, शिवीगाळ किंवा मारामारी करितात, आणि तुरुंगांत येऊन पड- तात. कांहीं जण अज्ञानामुळें किंवा मूर्खपणामुळे कायद्याच्या तावडीत सांपड- तात, व नसत्या अपराधाबद्दल त्यांच्यावर टकोरीं झोडण्याचा प्रसंग येतो. कित्येक दुसऱ्याच्या नादी लागून फसून येतात. कित्येक शुद्ध वेडे असतात, व शहाणे सरकारी अधिकारी नीट चौकशी न करितां त्यांना उचल कीं दे तुरुंगांत टाकून असें करितात. तुरुंग म्हणजे लोकांस असें वाटतें कीं एकत्र केलेल्या दुष्ट लोकांचें वसतिस्थान होय. त्याच्या भिंताडावरून आलेला वारा लागला तरी अपाय होण्याची भीति असते. पण ही भीति अगदीं निराधार आहे. लोकांनीं तुरुंगाचा विनाकारण एवढा बागुलबोवा करून ठेविला आहे. शिवाय लोक समजतात त्याप्रमाणें त्यांत मनुष्यजातीचा अत्यंत निंद्य भाग असतो असें मानिले तरी त्याचा तिरस्कार करणे आपणांस योग्य नाहीं. लोक अपराध करितात याचें कारण त्यांना शिक्षण मिळत नाहीं हें होय. श्रीमंत व सुशिक्षित घराण्यांतील लोकांकडून फारसा गुन्हा होत नाहीं, हैं निरनिराळ्या देशांतल्या तुरुंगांच्या रिपोर्टोवरून सिद्ध होतें. कोणत्याही देशांतील एकंदर तुरुंगांची आणि त्यांतील लोकांची संख्या कमी होत जाणें हें त्या देशाच्या वाढत्या सुधारणेचें चिन्ह होय. लोकांनीं सुशिक्षित व सदा- चरणी होऊन स्वतःचीं व सार्वजनिक कामें नेकीनें करावीं, आणि संसार- वृक्षाच्या स्वादु फलांचा उपभोग घ्यावा हाच ऐहिक सुधारणेचा मुख्य उद्देश होय. उच्च कुलांत जन्मास येणें हें कोणाच्या स्वाधीन नाहीं. अभि- जनत्व ही बाह्योपाधीवर अवलंबून राहणारी साहजिक गोष्ट होय. ती ज्यास परिश्रमाशिवाय प्राप्त झाली त्यांना फुशारकी मारण्याचें कांहीं कारण नाहीं. मनुष्यतेला कलंक आणणारे अपराध ज्या देशांत घडून येत असतात, त्या