या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १५२
कुंकुमार्चनानें सूतपुतळ्या विधावांनी सुद्धां सोंवळ्यांत वापरण्यासारख्या होतात. परटाकडील भाताची खळ लाविलेली चिरगुटे एका शिंतोड्यानें शुद्ध होतात, हा एक सोंवळ्याचा चमत्कारिक प्रकार ध्यानांत ठेवण्यासारखा आहे ! वास्तविक पाहतां कृमिज तंतूंस किंवा जनावरांच्या लोकरीपासून केलेल्या तंतूंस विशेष ओंवळेंपण चिकटलेलें असावें; पण त्यास कापसाच्या चिरगुटा- पेक्षां अधिक किंमत पडत असल्यामुळे त्यांची वस्त्रे कापसाच्या वस्त्रांहूनहि शुद्ध होऊन बसली आहेत ! पीतांबराचे शुद्ध कशानेच बिघडत नाहीं ! घावळी तर सोंवळ्याची खाण होऊन बसली आहे ! हलक्या किंमतीच्या नित्य वापरण्याच्या मुकटयांत व पीतांबरांत म्हणण्यासारखा फरक नसतो, एक दुसऱ्यापेक्षां अधिक शुद्ध ! अलीकडे वनस्पतिज तागी मुकटाही कृमिज मुका प्रतिस्पर्धा करू लागला आहे. ही वापरण्याच्या चिजांची स्थिति झाली. खाण्याच्या पिण्याच्या वस्तूंची दशाही यापेक्षां विशेष बरी आहे असें नाहीं. एका दृष्टीने पाहतां या खात्यांत जितका गोंधळ व जितकी असं- बद्धता आहे तितकी दुसरीकडे सहसा सांपडणार नाहीं ! हरभऱ्याची डाळ भिजवून वाटली, आणि तिची चटणी केली तर ती निर्लेप होऊन फरा- ळास चालते ! पण तीच डाळ अगोदर भिजवून पाट्यावर न चिरडतां, अगोदर जात्यांत चिरडून मग तिच्या पिठांत पाणी घातलें कीं तें खरकटें झालें ! त्याचे पिठलें मुकटा लावून घेतल्याशिवाय तोंडांत घालण्याची सोय नाहीं ! भडबुजाकडच्या पोह्याकुरमुऱ्यांसारख्या भाताच्या जाती राजरोसपणें खाण्यास काही हरकत नाहीं ! पण बाजाराच्या भाजीभाताकडे किंवा पावस- कुटांकडे ब्राह्मणानें पाहाण्याची सोय नाहीं ! दवाखान्यांत कोणत्याहि माणसानें कसलेंहि औषध दिले तरी तें चालतें, पण ट्रेचरच्या दुकानचे लेमोनेड किंवा सोडावॉटर उघडपणे पिणें म्हणजे ब्राह्मण्याला हरताळ लावण्यासारखे होय ! आग- गाडीने किंवा साध्या गाडीने प्रवास करतांना डब्यांतील दशम्यांस किंवा त्यांहून अधिक मोलाच्या फराळास कशाचाही स्पर्श झाला तरी चालतो, पण आपत्कालींहि कुणबिणीने केलेल्या भाकरीस स्पर्श करतां कामा नये ! अशा प्रकारचीं वेंकटीं किती म्हणून सांगावी ? याप्रमाणेंच मडकी, चुली, मेणबत्त्या, साबणाच्या वडया वगैरे दुसन्या प्रकारच्या वस्तूंचीहि विलक्षण स्थिति आहे. यापैकी कित्येकांत चरबी असते हैं ठाऊक असून त्या