या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५७ विविध विचार

त्याही दृष्टीनें ज्याचें त्याला किंवा इतरांना परिणाम विशेष सुखावह होण्याचा संभव नाहीं, असें आम्हांस वाटतें. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंग धोतरें नेसणें सोईस्कर नाहीं म्हणून युरोपिअन लोकांप्रमाणें दिवसभर पाटलान घालून बसणें, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसें करणें हें केवढें मूर्खपण आहे बरें ? ज्या देशांत आपले शेंकडों पूर्वज जन्मास आले, वाढले व मरण पावले; ज्या देशांतील हजारों पिढ्यांनीं अनेक गोष्टीत मोठ्या कष्टानें केलेल्या अनेक सुधारणांचें फळ आपणांस ऐर्तेच प्राप्त झालें- अशा देशांतील धर्माचा, रीतरित्राजांचा व लोकांचा सर्व- थैन त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधींहि शोभणार नाही. स्वभूमित, स्वलोकांत, स्वधर्मोत, आणि स्वाचारांत राहून अविचारी व अज्ञान देशबांधवांच्या निंदेस किंवा छलास न भितां, त्यांच्याशीं कधीं भांडून, कधीं युक्तिवाद करून, कधीं लाडीगोडी लावून, अथवा सामर्थ्य असल्यास कधीं त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणें यांतच खरी देशप्रीति, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरें शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे. याच्या उलट जे वर्तन करतात ते सुधारणा करीत नाहीत तर फक्त शृंखलां - तर करतात ! अशांच्या कपाळीं लिहिलेली खरी गुलामगिरी कधींहि सुटा- वयाची नाहीं. भरतखंडांत अशा प्रकारचे नवीन गुलाम उत्पन्न होण्यापेक्षां तें आहे त्या प्रकारचे गुलामांचें राष्ट्र राहिलें तरी हरकत नाहीं !

XXX
१८. महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र


 प्रिय देशबांधवहो, संमतीच्या बिलाच्या संबंधाने सुधारकांत अलीकडे आलेल्या कांहीं निबंधांतील भाषेची तीव्रता पाहून, तुम्हांपैकी कित्येकांच मनें त्यांवर रुष्ट झालीं असतील यांत संशय नाहीं. (न्यू इंग्लिश स्कूल, एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज वगैरे लोकोपयोगी संस्थांची स्थापना व उत्कर्ष, त्याचप्रमाणें मराठा किंवा केसरी पत्रांचा अवतार, प्रसार, आणि करवीरप्रकरण वगैरे गोष्टींशी या पत्राच्या नम्र लेखकाचा व रा. रा. बाळ गंगाधर टिळक यांचा असलेला संबंध ज्यांना ठाऊक आहे, व हे दोघे इसम बरीच वर्षे एकमेकांशी कसे वागत होते हैं ज्यांनीं पाहिलें आहे, त्यांना