या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५९ विविध विचार

मतभेद झाल्याशिवाय राहत नाहीं, तर ज्यांचा एकमेकांशीं कोणत्याही प्रकारचा कुलसंबंध नाहीं, व ज्यांनीं राजसेवेचा सामान्य मार्ग सोडून देऊन आपापल्या मनास प्रशस्त वाटेल त्या रीतीनें आपल्या ह्यातींत आपल्या हातून होईल तेवढे देशकार्य करण्याचा निश्चय केला आहे, त्थांचे विचार सवींशीं न जुळले व ज्याला त्याला प्रसंगविशषीं आपापल्या विचारांचा पराकाष्ठेचा अभिमान उत्पन्न होऊन, एकदां उभयतांनीं आरंभिलेल्या सामान्य गोर्टीस आमरण चिकटून राहणे स्वत:स किंवा इतरांस सुखास्पद व कल्याणप्रद होणारें नाहीं, अशी खात्री झाल्यामुळे ज्याच्या मनास जी दिशा अत्यंत आक्रमणीय वाटेल त्यानें ती धरणे, यांत नवल वाटण्यासारखें काय आहे, हें आम्हास समजत नाहीं ! बांधवही, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठीं भितां? दुष्ट-अIचाराचे_निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धि, सत्यसंशोधनव भूतदयेचा विचार इत्यादि मनुष्यांच्या सुखाची वृद्धि करणाच्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशांत हा कलह माजावा तितका कधींच न माजल्यामुळे, व बहुधा आमचे लोक * गतानुगतिक ? च असल्यामुळे हें भरतखंड इतकीं शतकें अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडले आहे ! हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊं न देण्याविषयीं मात्र खबरदारी ठेविली पाहिजे. नाहीं तर त्यापासून पुढे खच्या लढाया आणि रक्तस्राव होण्याचा संभव असतो. सुधारक आणि दुर्धारक, चपल सुधारक आणि मंद सुधारक, थंडे सुधारक आणि गरम सुधारक अथवा नाना प्रकारच्या मतांचे नवे आणि जुने लोक यांमध्यें सांप्रतकालीं जी दुही माजून राहिली आहे, ती पाहून घाबरून जाण्याचे बिलकूल कारण नाहीं ! पाश्चिमात्थ शिक्षणामुळे ज्या दिवशीं या वादास आरंभ झाला तो दिवस हिंदुस्थानच्या भावी इतिहासांत महोत्सव करण्यासारखा होईल. त्या दिवशीं अनेक शतकें गाढ निद्रेत घोरत पडलेला हिंदुस्थान देश किंचित् जागा होऊन चाळवू लागला, किंवा प्रेतावस्थ झालेल्या त्याच्या विस्तीर्ण देहांत ईशकृपेनें पुन: एकवार चैतन्यावतार झाला असे म्हणण्यास हरकत नाही. त्या दिवशीं त्याचे स्थाणुत्व नाहींसें होऊन त्याला जी यतूकिंचित् गति मिळाली ती प्रतिवर्षी अगदी यूव्र_प्रमाणांत का होईना, पण सारखी वाढत आहे, व जों जों हा विचारंकलइ निकराचा होऊँ लागेल तों तों झपाट्यानें होऊ