या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १६० लागणार आहे. आतां किती झाले तरी कलह तो कलह ! तो कशाही प्रकारचा आणि कितीहि सौम्य असला तरी त्यांत अप्रिय असें कांहींच नाहीं, असें कोठून होणार ? ज्या दोन मनुष्यांचा परस्परांशी संबंध आहे, त्यांपैकी एक दुसऱ्याच्या विरुद्ध जाऊं लागला म्हणजे कधीं त्या दोघांस एकमेकांशी वर्दळीस यावें लागेल; कर्धी एकमेकांवर शब्दप्रहार करावे लागतील; कधीं उभयतांनी आरंभिलेल्या कामांतून अंग काढून घेऊन विलग व्हावें लागेल; कधीं पदराला बराच खार लावून घ्यावा लागेल किंवा जिवाकडे पाहतां अहोरात्र मानसिक शारीरिक कष्ट करावे लागतील. पण जोपर्यंत आपण आपल्या विचाराच्या विजयासाठी व प्रसारासाठीं भांडत आहों, असें प्रत्येकाच्या मनांत वागत राहील तोपर्यंत न्यायसमेत पक्षकाराचें भांडण भांडणाऱ्या वकिलांच्या दिखाऊ वैराच्या फार पलीकडे अशा दोन व्यक्तींचे वैर जाईल असें आम्हांस वाटत नाहीं. आगरकर आणि टिळक यांच्या वैराचे स्वरूप याहून भयंकर नाहीं असें निदान त्यापैकी एकाला तरी वाटत आहे. तसेंच या वैरामुळे या दोघांच्या व्यासंगांत जें अंतर पडलें आहे तें कभी न होतां कदाचित् अधिक होत जाण्याचा जरी संभव आहे तरी जेव्हां खुद्द आगर- 'करांच्या किंवा आगरकरांच्या निकट आप्तांच्या डोळ्यांस पाणी येण्यासारखी कांहीं अनिष्ट गोष्ट घडेल तेव्हां इतरांपेश्चां टिळकांस व जेव्हां टिळकांचे घरीं तसा अनिष्ट प्रकार घडेल, तेव्हां आगरकरांस विशेष वाईट वाटून डोळ्यास पाणी येईल, व मतभेदांमुळे उत्पन्न झालेल्या वैराचा एका क्षणात विसर पडून एक दुसऱ्याला मदत करण्यास सहज प्रवृत्त होईल !
 धर्मराज्य व समाज यासंबंधानें अलीकडे जे औपपत्तिक सिद्धांत सर्व- मान्य होऊन बसले आहेत त्याविषयी आम्हा उभयतांत म्हणण्यासारखा मत- भेद नाहीं. मनुष्याच्या बुद्धीचे व्यापार इंद्रियाधीन असल्यामुळे या बुद्धीचें, ब्रह्मांडाच्या आदिकारणांचे किंवा परमेश्वराचे यथार्थ ज्ञान होण्याचा संभव नाहीं, हें धर्मतत्त्व मनांत बाळगून धर्मकल्पनांत किंवा धर्माचारांत जे फेरफार करावयाचे ते करीत गेलें पाहिजे; राजकीय स्वातंत्र्य असल्याशिवाय कोण- त्याही देशांत ऐहिक सुखाची परमावधि व्हावयाची नाहीं; पाश्चिमात्य शिक्ष- णाचा प्रसार आणि इंग्लिश लोकांचें साहाय्य असल्याशिवाय आमचे डोके वर निघण्याचा संभव नाहीं, याकरितां राजनिष्ठा यत् किंचित् ढळू न देतां राज-