या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गोपाळ गणेश आगरकर १९

© निंदूं लागले आहेत, व यामिनीस आपली समागमकारिणी मैत्रीण मानून तिच्या वाटेकडे जे डोळे लावून बसले आहेत अशा स्रीपुरुषांच्या प्राथमिक रतिसुखाची बहार कोणीकडे आणि पंतोजींचा मार खाणाऱ्या व अभ्यासाखालीं अर्धमेल्या झालेल्या दुर्बल, भेकड आणि लुस्कान अशा आमच्या १६-१७ वर्षांच्या बहुतेक पोरांच्या आणि बाहुलाबाहुलीचा व भातुकलीचा ज्यांचा खेळ नुकताच सुटला आहे व नवरा म्हणून ज्याच्याशीं आपला एकप्रकारें विशेष संबंध आला आहे, असा पुरुषजातीपैकी कोणी एक इसम आहे, असें ज्यांना नुकतेंच कोठें समजूं लागलें आहे, अशा आमच्या १२-१३ वर्षांच्या निस्तेज, लाजाळु व अज्ञान पोरींच्या बळजोरीच्या महालाची बहार कोणीकडे ?' >く X X

आधुनिक मराठी गद्याचा जन्म स. का. छत्रे यांच्या ' बाळमित्रा'च्या रूपानें १८२८ मध्यें झाला. पुढें १२ वर्षांनीं लोकहितवादींचीं  'शतपत्रे'  प्रसिद्ध होऊं लागलीं. १८५९ मध्यें विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा ' वेदोक्तधर्मप्रकाश ' झळकला. १८६०-१८७० च्या दरम्यान मराठी कादंबरीचा जन्म झाला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा, अरबी भाषेंतील गोष्टींचा सुरस अनुवादही याच काळांत निर्माण झाला. या सर्व लेखकांत रसिकता होती, ज्ञानप्रसाराची तळमळ होती आणि मातृभाषेची सेवा करण्याची उत्कट इच्छाही होती. पण प्रतिभागुणांच्या अभावामुळे या अर्धशतकांत ( १८१८-१८७४) बहुतेक मराठी लेखक बालबोध लेखनापलीकडे फारसें पाऊल टाकूं शकले नाहीत. लोकहितवादी आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यामध्यें विलक्षण सामाजिक तळमळ होती. पण त्या तळमळीला अनुरूप असा वाणीचा विलास त्यांना साध्य झाला नाहीं. सुंदर व ओघवती भाषा हा कृष्णशास्री चिपळुणकरांचा विशेष होता. पण ज्या राजकीय किंवा सामाजिक जिव्हाळ्यांतून स्वतंत्र विचारसरणी आणि तिला अनुरूप अशी ओजस्वी भाषाशैली निर्माण होते, तो जिव्हाळा त्यांच्यापाशीं नव्हता. त्यामुळे १८७४ सालीं निबंधमालेचा जन्म होईपर्यंत मराठी भाषेची स्थिति एखाद्या बाहुलीसारखी होती. ती दिसायला नीटनेटकी असली तरी निरखून पहाणाराला तिचा निर्जीवपणा चटकन् जाणवे. तिच्यावर वस्राभरणें झळ-