या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२९ गोपाळ गणेश आगरकर

संभोग करण्याचा हक्क नवऱ्यास आहे असें प्रतिपादन करणाऱ्या, अथवा नवऱ्याच्या प्रेताबरोबर त्याच्या बायकोचे केंस जाळले तरच त्यास सद्गति मिळते अशी बडबड करणा-या अमानुष लोकांनीं आम्हांस राजकीय हक्क द्या म्हणून तोंडें वेंगाडणें अत्यंत विसंगत व अस्वाभाविक आहे. बाहेरची गुलामगिरी नको असेल तर अगोदर घरची गुलामगिरी नाहीशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गृहसुधारणेस प्रतिकूल असणाच्या लोकानीं केवढीही हुल्लड करून दिली तरी अखेरीस ते मागें पडल्याशिवाय राहत नाहींत, हें इजिप्शियन, पर्शियन, मुसलमान वगैरे लोकांच्या इतिहासापासून समजण्यासारखें आहे. ज्या देशांतील गृहें पारतंत्र्याच्या आणि जुलमाच्या शाळा आहेत, त्या देशांत महापुरुषांची परंपरा निर्माण कशी व्हावी, आणि ज्ञान, कला, संपत्ति व स्वातंत्र्य वगैरे इष्ट वस्तूंची त्यास प्राप्ति होऊन त्याचा उपभोग त्यांना चिरकाल कसा मिळावा, हें आम्हांस समजत नाही. ’ X 'बाहेरची गुलामगिरी नको असेल तर अगोदर घरची गुलामगिरी नाहींशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे' ही आगरकरांची शिकवण किती यथार्थ होती हें गेल्या पन्नास वर्षांतल्या हिंदी राजकारणाच्या इतिहासानें सिद्ध केलें आहे.गांधीजींना आगरकरांचे नांव कदाचित् ऐकूनहिं ठाऊक नसेल! पण काळानें लोकमान्यांच्या क्रांतिकारक राजकारणाचा वारसा जसा त्यांच्याकडे दिला, तसा आगरकरांच्या सामाजिक क्रांतीचा ध्वजही त्यांनाच आपल्या हातांत घ्यावा लागला. राजकीय स्वातंत्र्य व समाजसुधारणा हीं क्षेत्रे एकमेकांपासून अलग ठेवण्याची अनिष्ट प्रथा गांधीजींनीं नाहींशी केली यांतच त्यांचे पुढारी या नात्यानें खरें मोठेपण आहे. हें हीं एकाच रथाचीं दोन चाके आहेत, किंबहुना हे एकाच धनुर्धराचे दोन हात आहेत ही गोष्ट अखंड आणि अविश्रांत प्रचार करून त्यांनी बहुजन समाजाच्या गळीं उतरवली. हिंदभूमीच्या स्वातंत्र्याप्रमाणे बालाविधवेच्या सौभाग्याचीही चर्चा महात्माजींच्या लेखांत आढळते आणि हिंदी शेतकऱ्यांच्या भीषण दारिद्याप्रमाणें हिंदी स्त्रीवर लादलेल्या विचित्र दास्याचाही ते अत्यंत आपुलकीनें विचार करूं शकतात, याचे कारण प्रगति सर्वांगीण असते या त्यांच्या