या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

४८

वांचा स्वीकार करण्यास आम्ही आनंदाने तयार झालें पाहिजे, ती तत्त्वें हा सुधारक महाराष्ट्र लोकांपुढें वारंवार आणील. असें करण्यांत त्यास, आज ज्याचा जानें अंमल चालत आहे, त्या लोकमताविरुद्ध बरेंच जावें लागणार असल्यामुळे, फार त्रास पडणार आहे. पण त्याची तो पर्वा करीत नाही; कारण ज्या लोकमताचा पुष्कळांस बाऊ वाटतो, त्याचा सूक्ष्म दृष्टीनें विचार केला असतां असें दिसून येईल की, बऱ्याच बाबतीत त्याचा आदर करण्यापेक्षां अनादर करणें हाच श्लाघ्यतर मार्ग होय. कोट्यवध अक्षरशत्रु व विचारशून्य मनुष्यांनी आपल्या अडाणी समजुतीप्रमाणें चांगलें म्हटले किंवा वाईट म्हटले; अज्ञान व धर्मभोळ्या लोकांच्या आचरट धर्म- कल्पनांची व वेडसर सामाजिक विचारांची प्रशंसा करून; त्यापासून निघेल तेवढी माया काढणाऱ्या स्वार्थपरायण उदरंभरू हजारों टवाळांनी शिव्यांचा वर्षाव केला किंवा छी:-थू करण्याचा प्रयत्न केला; शेंकडों अविचारी व इकट लोकांनीं नाके मुरडली किंवा तिरस्कार केला, सारांश ज्यांना मनु- प्र्याच्या पूर्णावस्थेचें रूप बिलकूल समजलेले नाहीं किंवा ती घडून येण्यास काय केलें पाहिजे हें ठाऊक नाहीं, अशांच्या पर्वतप्राय झुंडीच्या झुंडी तुटून पडल्या तरी, जो खरा विचारी आहे, ज्याला लोकल्याणाची खरी कळकळ आहे, सत्य बोलणें व सत्यास धरून चालणे यांतच ज्याचें समा- धान आहे, अशाने वरच्यासारख्या क्षुद्र लोकांच्या अवकृपेला, रागाला किंवा उपहास्यतेला यत्किंचित् न भितां आपल्या मनास योग्य वाटेल तें लिहावें; बोलावें व सांगावें हें त्यास उचित होय. त्याच्या अशा वर्तनांतच जंगांचे हित आणि त्याच्या जन्माची सार्थकता आहे.