या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमचे दोष आम्हांस कधीं दिसूं लागतील ?


 अलीकडे देशाभिमान्यांची जी एक जात निघाली आहे, तिच्यापुढे इंग्र- जांची किंवा दुसऱ्या कोणत्याही अर्वाचीन, युरोपिअन लोकांची उद्योगा- बद्दल, ज्ञानाबद्दल, किंवा राज्यव्यवस्थेबद्दल प्रशंसा केली कीं, तिचें पत् खुवळून जातें ! या जातवाल्यांना दुसऱ्याचा उत्कर्ष किंवा त्याची स्तुति साइण्याचें बिलकूल सामर्थ्य नाहीं ! पण करतात काय बिचारे ! सूर्याला सूर्य म्हटल्याखेरीज जसें गत्यंतर नाहीं, तसें युरोपिअन लोकांचें श्रेष्ठत्व या घट- केस तरी नाकबूल केल्यास आपलें हंसें झाल्यावांचून राहणार नाहीं, हें त्यांना पक्के ठाऊक आहे ! तेव्हां ते काय हिकमत करितात कीं नेटिव युरो- पियनांची तुलना करण्याची वेळ आली कीं, ते आपल्या गतवैभवाचे गाणे गाऊं लागत'त ! इंग्रज लोक अंगाला रंग चोपडीत होते; इंग्रज लोक कच्चें मांस खात होते; इंग्रज लोक कातडी पांघरीत होते; इंग्रज लोकांस लिहि- ण्याची कला ठाऊक नव्हती त्या वेळेस आम्ही मोठमोठाल्या हवेल्या बांधून रहात होतों; कापसाच्या किंवा लोकरीच्या धाग्यापासून मोठ्या परिश्रमानें विणून तयार केलेली वस्त्रे वापरीत होतों; बैलांकडून जमीन नांगरून तीत नानाप्रकारचीं धान्यें, कंदमुळें, व फळें उत्पन्न करीत होतों; आणि रानटी लोकांप्रमाणें मांसावर अवलंबून न राहतां आपला बराच चरितार्थ वनस्पत्यांवर चालवीत होतों. यावरून मांसाहार आम्ही अगदींच टाकला होता असें मात्र कोणी समजूं नये. ज्या गाईच्या संरक्षणासाठी सांप्रत काळीं जिकडे तिकडे ओरड होऊन राहिली आहे, व जें संरक्षण कित्ये- कांच्या मतें हिंदुमुसलमानांचा बेबनाव होण्यास बऱ्याच अंशीं कारण होत आहे, त्या गाईंचा देखील आम्ही प्रसंगविशेषीं समाचार घेण्यास मागेंपुढे पहात नव्हतों ! कोणी विशेष सलगीचा मित्र किंवा आप्त पाहुणा आला आणि बाजारांत हवा तसा जिन्नस न मिळाला म्हणजे लहानपणापासून चारा घालून व पाणी पाजून वाढविलेल्या गोन्याच्या अथवा कालवडीच्या माने- वर सुरी ठेवण्यास आम्हांस भीति वाटत नव्हती ! आतां येवढें खरें आहे कीं