या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५१

आमचे दोष आम्हांस कधीं दिसूं लागतील?

तुम्ही त्यांच्यापेक्षां अधिक सुधारलेले असायला पाहिजे होतां. पण तसे तर तुम्ही खचित नाहीं ! तेव्हां हें सिद्ध आहे कीं केव्हां तरी तुमच्या सुधारणेस खळ पडला असावा; किंबहुना ती मार्गेच हहूं लागली असावी; कारण सुधारणा ही स्थिर वस्तु नाहीं; ती पुढें चालेल किंवा मागें सरेल ! आमची सुधारणा क्षणैक निश्चल होऊन मग तिची पीछेहाट होऊं लागली असावी असें मानिल्याखेरीज ज्यांस आम्ही रानटी म्हणत होतों तीं राष्ट्रें दोन हजार वर्षीच्या अवकाशांत आम्हांपुढे इतकीं कशी गेलीं याचा उलगडा होत नाहीं. सुधारणेच्या शर्यतींत जे एकदां आमच्या फार पाठीमार्गे होते, त्यांनी आम्हांस गांठलें इतकेंच नाहीं, तर पाठीमागे टाकलें, असें आपल्या स्थिती- वरून कबूल करावें लागलें यांत आमच्या मतें प्रतिष्ठा मारण्यासारखें कांहीं नाहीं. म्हणे ' दुसरे लोक रानटी होते तेव्हां आम्ही फार सुधारलेले होतों !, असाल कदाचित् पुनः पुनः गत गोष्टीबद्दल मिटक्या मारीत बसण्यांत काय अर्थ आहे ? आम्हांस तर असल्या निरुपयोगी प्रतिष्ठेचा मनापासून कंटाळा येतो. असल्या प्रतिष्ठेमुळे स्वदोष दिसेनासे होतात इतकेंच नाहीं, तर आपण सर्वगुणसंपन्न आहों, आपणांस कशाचीही उणीव नाहीं, असें वाटू लागून उद्योग करण्याची हौस नाहींशी होते, मानसिक व शारीरिक श्रमाचा तिर - स्कार येऊं लागतो, नुसत्या बढाईखोर गप्पा मारीत बसण्यांत मोठा आनंद वाटतो, आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दारिद्रयाचा व आपत्तीचा परिहार करण्याचा विचार देखील मनांत येईनासा होतो ! पण या आत्म- वंचक व परवंचक देशाभिमान्यांचा आम्हांस जो विशेष राग येतो तो यासाठीं कीं, आपल्या जुन्या सुधारणेची तुलना न करितां ते आपलीच सुधारणा सर्वोत श्रेष्ठ होती असें घेऊन चालून तिचे पवाडे गात सुटतात ! लिहिता वाचतां येणाऱ्या लोकांत ज्यांना दुसऱ्या देशाविषयीं कमीत कमी माहिती आहे असे कोणी लोक असतील तर ते हिंदुलोक होत. यांना स्वतःस इतिहास लिहिण्याची आवश्यकता कधींही वाटली नाहीं, व लिहि- ण्याची अक्कल आली नाहीं. इतकेंच नाहीं, तर दुसऱ्यांचे इतिहास अव- लोकन करून त्यापासून आपली सुधारणा करण्याची पर्वाही त्यांनी कधीं केली नाहीं. एकंदरीत यांना इतिहासाचे माहात्म्यच समजलें नाहीं असें तरी कां म्हणूं नये ? अथवा त्यांना तें समजलें नाहीं यांत त्यांच्याकडे