या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६५ आमचे दोष आम्हांस कधीं दिसूं लागतील ?
करण्यासारखें आम्हीं गेल्या दोन हजार वर्षांत काय केलें आहे हें दाखवि - ण्याची कृपा करावी. ज्या देशांत प्रतिवर्षी कोट्यवधि मनुष्यप्राणी जन्मास येत आहेत व परलोकास जात आहेत, त्या देशाच्या एखाद्या कोपऱ्यांत एखाद्या शतकांत एखाद्या व्यक्तीनें किंवा लहानशा व्यक्तिसमुदायानें थोडीशी चळवळ केली तर तेवढीवरून येवढें विस्तीर्ण राष्ट्र वास्तविकपणें सचेतन असून त्याची प्रगति होत आहे असें म्हणतां येत नाहीं. चंद्रगुप्तापासून रावबाजीपर्यंत जो आमचा लांबच्या लांब इतिहास आहे किंवा जो आम्ही लांबच्यालांब काळ घालविला त्यांत तोडरमल, पूर्णय्या किंवा भवभूति यां- सारखे कांहीं पुरुष होऊन गेले, अथवा राजपुतान्यांतील रजपुतांसारखे किंवा महाराष्ट्रदेशांतील मराठ्यांसारखे कांहीं लढवय्ये होऊन गेले, असें सांगित- त्यांने आमच्या ऐतिहासिक शून्यतेस विशेष बाध येतो असें आम्हांस वाटत नाहीं खरें म्हटलें तर चंद्रगुप्तापूर्वीच आमचा राष्ट्रचंद्र मावळला होता, असें म्हणण्यास हरकत नाहीं. दोन किंवा अडीच हजार वर्षापूर्वी ज्या प्रकारच्या राज्यविचारांनी, धर्मविचारांनीं व सामाजिक विचारांनी आम्ही निगडित झालों होतों, व त्या वेळीं ज्या आचारांचे आम्ही गुलाम होतों तेच आचार व तेच विचार अद्यापि आम्हांस बहुधा आपल्या कह्यांत ठेवीत नाहीत काय ? कोणतीही अचेतन वस्तु बहुधा दोन हजार वर्षे टिकत नाहीं. पण टिकलीच तर तींत जमीनअस्मानाचें अंतर झाल्याखेरीज रहा - वयाचें नाहीं. पण आम्ही पहा कसे आकाशासारखे अथवा समुद्रासारखे जसेच्या तसे! बिचाऱ्या आकाशाच्या किंवा समुद्राच्या स्थितींत देखील येवढ्या कालांतरानें शास्त्रज्ञ प्रेक्षकाच्या नजरेस येण्यासारखा फेरफार होत असेल किंवा झाला असेल. पण आमच्या शोचनीय राष्ट्रस्थितींत गेल्या दोन हजार वर्षात म्हणण्यासारखा फेरफार झाला आहे, असें बहुधा कोणाही विचारी पुरुषास म्हणतां येणार नाहीं ! येथें राहणाऱ्या पांच कोटी लोकां- च्या जागीं दहा कोटी लोक झाले असतील, किंवा दहांचे जागीं वीस कोटी झाले असतील; सिथियन लोकांनी आमची मानगुटी सोडली असेल तर ती मुसलमानांनीं धरली असेल, व भुसलमानांनीं ती सोडली असेल, तर ती इंग्रजांनीं धरली असेल; जेथें लागवडीत होता तेथें आतां तीन असतील; व जेथें पूर्वी दहा खोपर्टी होतीं पूर्वी जमिनीचा एक विघा