या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६१

भारतीय कलांचे पुराणत्व

जुन्या हस्तकलेचें रक्षण झाले, व पाश्चिमात्य यंत्रकलेनें या भूर्मीत बळकट मूळ धरलें असें म्हणतां येणार आहे.
 आमच्य, शोचनीय स्थितीमुळें, रामायण व महाभारत या महापुराणांचा अभ्यास आमच्या हातून जसा व्हावा तसा मुळींच होत नाहीं. पूर्वपद्धतीचे कांहीं लोक तीं पोथीपुढील तांदुळासाठीं, व्यासपूजेच्या प्राप्तीसाठीं, सप्ता- हाच्या फायद्यासाठी, किंवा बिदागीसाठी वाचतात ! अलीकडील तरुण लोक तीं परीक्षा पास होण्यासाठी वाचतात ! इतिहासदृष्टीनें त्यांच्याकडे अवलोकन करून ज्यानें त्यांच्या वाचनास आरंभ केला आहे, व तें तडीस नेलॅ आहे, असा बहुधा एकही अर्वाचीन विद्वान् सांपडणार नाहीं. एखादा बुद्धिवान् व कल्पक विद्वान या दोन ग्रंथांचा यथास्थित रीतीनें अभ्यास करील तर भारतीय आर्योच्या पौराणिक कालांतील स्थितीचें प्रत्येक बाबतीत विश्वसनीय, मनोरंजक व बोधावह असें चित्र त्यास काढतां येणार आहे ! पण असले काम नीट रीतीनें होण्यास लागणारा राजाश्रय किंवा लोकाश्रय आम्हांस मिळत नसल्यामुळे यांचे जितकें मंथन व्हावयाला पाहिजे आहे तितकें अद्यापि कोणीही केलेलें नाहीं, व पुढेही तें अशाच स्थितीत कर- ण्यास कोणी झटेल, असें आम्हांस वाटत नाहीं. कार्मे धरल्यास, त्यांत खुद्द सरकारकडून व साक्षात् किंवा परंपरेनें पुष्कळ मदत होते. इतिहासदृष्टीने या ग्रंथांकडे पाहून त्यांच्या मदतीनें येथील जुनी स्थिति कशी असावी; राज्यपद्धति कोणत्या प्रकारची असावी, राजा आणि प्रजा यांचे अन्योन्य संबंध कसे होते; वर्णा- वर्णात द्वेषभाव असे कीं संतोषवृत्ति असे; राजावर लोक प्रीति करीत किंवा त्याला नाखूष असत; कायदे कोण करी; कर कोणत्या प्रमाणानें, कशावर, व केव्हां घेत; सैन्याची व्यवस्था कशी काय ठेविली जात असे; स्वदेशी व्यापाराला उत्तेजन देऊन परकी देशाचा माल स्वदेशांत येऊ न देण्याबद्दल निर्बंध करीत असत किंवा नाहीं; व्यापारांचीं मुख्य ठिकाणे कोणती होती; कोणकोणत्या जिनसा विशेष पिकत, अथवा कोणता जिन्नस कोणत्या ठिकाणीं विशेष सुबक होत असे आणि त्याला काय किंमत पडे लोकशिक्षणाची व स्त्रीशिक्षणाची सामान्य स्थिति कशी होती स्त्रियांस, नोकरांस व इतर परोपजीवी लोकांस कोणते हक्क असत, व त्यांचा सांभाळ कोणत्या रीतीनें इंग्लिश लोकांनी असल सरकारी अधिकाऱ्यांकडून