या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
દૂર होत असे वगैरे गोष्टींविषयीं उत्कृष्ट माहिती या दोन पुराणांत खचित सांपडेल, अशी आमची खात्री आहे. पण इतका शोधक व सुखवस्तु वाचक येथे कोठून पैदा होणार ? व झाला तरी तो आम्हांस लाभणार कसा? फटदिशीं तो एखादे ठिकाणी रावसाहेब होऊन वसावयाचा, किंवा कोठें वकिलाचें ' प्रॅक्टिस ' करूं लागायचा, अथवा एखाद्या नेटिव्ह संस्था - निकाच्या पदरीं चार-दोनशे रुपयांवर पडून रहायचा ! सध्या आमच्या- संबंधानें हें बिकट काम युरोपियन लोक करीत आहेत, व तें आमच्या हातून नीट होऊं लागेतोंपर्यंत, युरोपियन लोकांच्या शोधांवर, व कांहीं अंशी त्यांच्या कल्पनांवर, आम्हांस अवलंबून असले पाहिजे. प्रस्तुत निबंधही सर जार्ज वर्डवड यांनी हिंदुस्थानच्या कलांच्या पुराणत्वाचें जें मंडन केलें आहे त्याच्या अनुरोधानें लिहिले जात आहेत.
 रामायण आणि भारत हीं इतिहासाचीं पुस्तकें नाहींत हें जरी खरें आहे, तरी जो ऐतिहासिक दृष्टीनें त्यांकडे पाहील त्याला त्यांपासून तत्कालीन व त्या पूर्वीच्या समाजाच्या अंतर्बाह्य स्थितीविषयी बरीच माहिती मिळणार आहे. प्रस्तुत विषयाच्या समर्थनासाठी सर जॉर्ज यांनी रामायणांतून एकच उदा- हरण घेतलें आहे. पण तेवढ्यावरूनसुद्धां पौराणिक कालांत आमच्या कलांची व कारागिरीची स्थिति कशी होती, हें सहज समजण्यासारखे आहे. रामा- याच्या दुसऱ्या कांडांतील एकोणिसाव्या अध्यायांत अयोध्येतील लोक भरतासह जो रामाचा शोध लावण्यास निघाले आहेत त्याचें वर्णन आहे. रामशोधार्थ काढलेली भरताची स्वारी मोठ्या थाटानें व व्यवस्थेने निघाली होती. हींत प्रत्येक धंद्याचे लोक असून, धंद्याच्या महत्त्वाच्या अनुरोधानें त्यांच्या रांगा लाविल्या होत्या, व त्या त्या धंद्यांतील प्रमुख इसमांना त्यांचे पुढारी किंवा नायक नेमिलें होतें. या प्रसंगी हजर असलेल्या लोकांत अग्र- स्थान जवाहिन्यांस दिलें होतें. जवाहिन्यांच्या पाठीमागून कासार चालले होते, व कासारांच्या मागून हस्तीदंती काम करणारे, गंधी, सोनार, कोष्टी, लोकर विणणारे, सुतार, पितळेचें काम करणारे, चितारी, गायनाची वाद्ये करणारे, शस्त्रे करणारे, लोहार, तांबट, पुतळे करणारे, स्फटिक कांपणारे, कांच करणारे आणि असेच इतर कारागीर अनुक्रमानें जात होते. ही यादी पाहून रामायणकाल हे धंदे हिंदू लोकांस माहीत नव्हते असे कोण म्हणूं