या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

६८

कुरण होतात, असें नहीं. प्रजेकडूनही त्या कामांत बरीच मदत होते. मनुष्यमात्राचा असा स्वभाव आह का लहानपणापासून जं स्थिात ता किताहा वाईट असली तरी तीच बरी वाटत असते. ज्यांना जन्मापासून स्वातंत्र्याचा उपभोग मिळत आहे त्यांना पारतंत्र्याचा जसा कंटाळा असतो, त्याप्रमाणे जे जन्मापासून पारतंत्र्यांत वाढलेले असतात, त्यांना स्वातंत्र्य आपणांस उचित नाहीं, असें वाटू लागतें. आज मित्तीस आपणांपैकीं शिकलेले अनेक लोक त्रियांस स्वातंत्र्य देण्यास तयार आहेत, पण त्याचा उपभोग घेण्यास आमच्या स्त्रीवर्गाची कोठे तयारी आहे ? आम्ही तें त्यांना जबरीनें देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्यापासून सुख न होतां, उलट त्रास होतो. जे हौशी लोक आपल्या बायका नाटक पाहण्यास किंवा हवा खाण्यास बरोबर घेऊन जातात त्यांच्या डोळ्यांपुढे वरील विधानांचे यथाथ्र्य आल्याशिवाय राहणार नाहीं ! अशा प्रसंगीं स्त्रियांचा कावरेबावरेपणा, डोळे वर करून पाहण्याची व स्पष्टपणे बोलण्थाची भीति, पुरुषांच्या मागोमाग चालण्यास वाटणारी शंका वगैरे गोष्टींमुळे त्यांची जी विलक्षण वृत्ति होते तीवरून अशा रीतीनें समाजांत येण्यापेक्षां घरांतल्या घरांतच राहणे बरें असें त्यांस वाटत असावें असें स्पष्टपणे दिसत असतें. यावरून कोणी असें समजूं नये कीं, जी गोष्ट आमच्या स्रियांनीं पूर्वी कधीं न केल्यामुळे आज त्यांना अवघड वाटत आहे. ती आपण त्यांच्याकडून कधींच करवू नये. ज्या गोष्टींविषयीं अपिण अपरिचित असतों ती प्रथम करूं लागतांना किती संकटावह होते, हें दाखविण्यासाठीं मात्र वरचे उदाहरण दिले आहे; त्याहून येथे {दुसरा हेतू नाहीं. तात्पर्य, जन्मादारभ्य ज्या गोष्टींची आपणांस संवय लागलेली असते, त्या गोष्टी इतरांस कितीही वावग्या वाटत असल्या व त्यांपासून अखेरीस आपलें केवढेही नुकसान होण्याचा संभव असला, तरी त्या अTपणांस बया वाटतात आणि त्या टाकणें आपणांस सहसा रुचत नाहीं. दूर कशाला, आपल्या लोकांच्या राजकीय विचारांकडेच क्षणभर पहा. आम्ही पहिल्यापासून आनियंत्रित एकसत्तात्मक राज्यपद्धतीत वाढलेलों असल्यामुळे _राजLकालस्य-कारणम्’ अशी आमची पक्की समजूत, व ज्या त्या गोष्टींत राजाच्या तोंडाकडे पाहण्याची आम्हांस खोड ! लोकशिक्षण असो; व्यापारदृद्धि असो; यांत्रिक शोध असो; मादक द्रव्यसेवननिषेध असो; सामान्य