या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुधारणा म्हणजे काय ?
 ज्यांनी कोणत्याही मोठ्या समाजास प्राप्त झालेल्या स्थित्यंतराचा इतिहास थोडासा वाचला असेल त्यांना मनुष्याच्या सामाजिक व्यवहारांस कोणती दिशा लागत चालली आहे, हें सहज समजण्यासारखे आहे. अनियंत्रित राजांचा अंमल कमी होत जाणे, व सृष्टयंतर्गत सामर्थ्याचे आपण गुलाम आहों, व त्यांच्या सर्वशक्तिमत्वापुढे आमचें कांहीं एक न चालतां त्यांच्या इच्छेनुरूप आम्हांस निरंतर वागले पाहिजे, या चुकीच्या कल्पनेचा लय होत जाऊन मनुष्य प्रयत्न करील तर सृष्टयंतर्गत पदार्थोंचें ज्ञान त्यास प्राप्त करून घेतां येऊन कालांतराने त्या पदार्थोसच त्यास आपले दास करून घेतां येईल, असा विश्वास वाढत जाणे-या दोनच गोष्टींचा नीट विचार केला तरी बाकीच्या गोष्टींविषयी बरीच समजूत पडणार आहे. सचेतन व अचेतन सृष्टीचा दास मी नाहीं, तर तिला दास करण्याचा, निदान तिच्याशीं बरो- बरीने वागण्याचा हक्क किंवा अधिकार मला आहे, असा विचार मनुष्याच्या अंतःकरणांत वागू लागला म्हणजे त्याच्या मनांत या वृत्तीचा प्रादुर्भाव झाला नाही तोपर्यंत त्याच्या हातून घडत असलेल्या क्रिया किंवा त्याचें वर्तन बला- त्कारानें, जबरदस्तीनें किंवा सक्तीने होत असतें, असें म्हणण्यास हरकत नाहीं. अशा रीतीने होत असलेले वर्तन केवळ वाईटच असेल असा नियम नाहीं. पुष्कळदां तें चांगलेही असण्याचा संभव आहे. पण तें परप्रेरित असल्या- मुळे त्याच्या चांगुलपणाची किंवा वाईटपणाची जबाबदारी त्या वर्तन करणारावर असत नाहीं. शिवाय, असें वर्तन बळजोरीनें करविण्यांत तें करवि- णाऱ्याचें विशेष लक्ष स्वहिताकडे असल्यामुळे, अनेक प्रसंगी ते करणान्यांचे हित मुळींच साधत नाहीं. यामुळे जोपर्यंत कोणत्याही राष्ट्रांतील लोक- समूहांत स्थूल मानानें स्वाभी आणि किंकर असे दोनच भाग होऊन राहि- लेले असतात तोपर्यंत त्यांत सुखावस्थेची परमावधि होण्याचा संभव नाहीं. स्वातंत्र्य हैं स्वभावतः सुखावह, आणि पारतंत्र्य हैं स्वभावतः दुःखावह असें आहे. पण मनुष्याच्या व कांहीं इतर प्राण्यांच्या शरीरांची व मनाची घटना