या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करून कां दाखवीत नाहीं ?

 हे सुधारक लोक अमुक गोष्ट चांगली, तमुक गोष्ट वाईंट ; अमक्या गोष्टीसाठी कायदा करावा, तमकीसाठी मंडळी स्थापावी; अशी जी एक- सारखी वटवट करीत असतात ती कशासाठी ? अमक्या अमक्या गोष्टी करण्यांत आपला व दुसऱ्याचा फायदा आहे, अशी त्यांची पक्की खात्री झाली असेल तर त्यांनी त्या करून दाखविण्यास कां प्रवृत्त होऊं नये ? असा प्रश्न वारंवार पुष्कळ लोक करीत असतात, व बोलण्याप्रमाणें सुधारकांचे आचरण नाहीं, तेव्हां त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यांत कांहीं अर्थ नाहीं, असा गर्वयुक्त प्रलाप करून, आपल्या कोत्या समजुतीनें आपलें समाधान करून घेत असतात ! या अज्ञान जातींत तीन प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. एक, ज्यांना नवीन गोष्टींचे चांगलेपण कळण्याची अक्कलच नाहीं असे. असल्या लोकांच्या कानांपाशीं हवा तितका आक्रोश करा, प्रभाणें दाखवा, मारा, तोडा - काय पाहिजे तें करा, हे म्हणून कांहीं केलें तरी आपला ग्रह सोडावयाचे नाहींत ! गव्याच्या धांवेसारखी यांची धांव असते. वयांत येईपर्यंत कसले बसले जे ग्रह झाले असतील ते यांची जन्माची पुंजी ! ती नर्वे जुने कधीही व्हावयाचें नाहीं ! यांचें ज्ञान अत्यंत स्वल्प असतांही यांना सर्वज्ञतेची फारच मोठी घमेंड असते, व नवीन विचारांचा व ज्ञानाचा तिरस्कार करण्यांत हे कोणासही हार जाण्यासारखे नसतात ! सारांश, ओतीव लोखंडाप्रमाणे यांचे आचार व विचार असतात, व कोणाचाही यांच्याशीं सामना झाला असतां त्यापासून रागाच्या ठिणग्या पडण्याखेरीज दुसरा कोणताही परिणाम होत नाहीं ! दुसऱ्या प्रकारांत समंजस पण भेकड असे लोक येतात. यांना चांगले काय व वाईट काय, त्याज्य काय व संग्रहणीय काय हे समजत असते; पण जें योग्य वाटत असेल तें बोलण्याचे किंवा कर- ण्याचें धैर्य यांच्या अंगीं बिलकूल नसतें. ते लोकापवादाच्या ओझ्याखालीं दडपून गेलेले असतात. डोळे बांधलेला तेल्याचा बैल ज्याप्रमाणें घाण्या- सभोंवर्ती एकसारखा फेन्या घालीत असतो, त्याप्रमाणें हे पोटांत ज्ञान