या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा- ९१ अल्प वयांत संतति गमावणें, अशक्त संतति होणें, पुष्कळ बायकांस लहानपणींच आईचें पद प्राप्त होणें, सामान्य वयांत त्या केवळ दुबळ्या बनणें, पुष्कळांस बाळंतरोग होणे, त्यांच्या पाठीशीं मुलांची माळच माळ लागणे, बाळंतपण सुखाचें न होतां वेडेवांकडे प्रसंग येणें, इत्यादि पुष्कळ हानिकारक गोष्टी, या एका गोष्टीकडे लक्ष दिल्यास नाहींशा करितां येण्यासारख्या आहेत. ३७ वास्तविक म्हटलें म्हणजे, व्यंग, अशक्त, रोगी, अशी संतति झाल्यास तिचा विवाह न करणे चांगलें. पण ही गोष्ट मुलांमुलींस सारखीच लागू आहे. मुलींचे विवाह झालेच पाहिजेत, असें म्हटलें, की त्यांस कोणाच्या तरी गळ्यांत बांधलेंच पाहिजे, असें झालें; या चालीचे परिणाम फार वाईट होतात. समाजांत दुबळ्या संततीची भर पडते. बापास विनाकारण त्रासांत पडावें लागतें. लयास रिकामी काळजी वाहावी लागते, व विनाकारण खर्चात पडावें लागतें. तो त्रास त्याच्या कुटुंबासही जाचक होतो. हें समाजास व राष्ट्रास सारखेंच घातक आहे. याकरितां हे विवाह टाळावयाचे असल्यास, अशा मुलींस लन्नाशिवाय समाजांत राहतां आलें पाहिजे; म्हणजे मुलांप्रमाणें कांहीं मुली समाजांत अविवाहित राहिल्या, तरी तो दोष असें समाजानें मानितां उपयोगीं नाहीं. परंतु असें ठरलें नाहीं, तोंपर्यंत आईबापांस त्यांचे विवाह करणें भाग आहे. अशा मुलींशीं विवाह करण्यास कोणी तयार नसतो. बापास कोणास तरी द्रव्याची लालूच दाखवून, लग्न लावण्यापुरता उभा करण्याची वेळ येते. अशा मुलींचा व कदाचित् त्यांस संतति झाल्यास त्या संततीचा, भार आईबापांस सोसावा लागतो. मुलीचा विवाह केल्याशिवाय गल्यंतर नसल्यामुळे, बापास वृथा अडचणींत पडावें लागतें. ३८ व्यंग मुलांस विवाहाशिवाय राहतां येतें. त्यांस समाजाची अडचण नाहीं. पण बापाजवळ संपत्ति असली म्हणजे त्या संपतीच्या जोरावर, तो आपल्या मुलाचे दोन हातांचे चार हात करून घेतो. मुलगा लप्ताशिवाय राहाणें हेंच ह्यास मोठे लांच्छन वाटतें.