या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

SR आईबापांचा मित्र. अशा रीतीनें विवाह करणें फार वाईट. प्रथम आईबापांस तसे वाटत नाहीं. अनुभवान्तीं, आपल्या अविचारी कृत्यांचीं कडू फळे, त्यांस चाखण्याची वेळ आली म्हणजे त्यांचीं तोंडें गोरींमोरीं होतात, व त्यांस वाईटही वाटतें, पण मग त्याचा उपयोग नसती ! ३९ मुलगी असावी चित्रासारखी सुरेख, पण बापानें तिला एखाद्या श्रीमंताच्या कुरूप मुलाच्या गळ्यांत बांधावी; किंवा एखादी हुशार मुलगी, एखाद्या अक्षरशत्रूच्या गळ्यांत अडकवावी; जशी कांहीं संपत्ति सर्व उण्या गोष्टी पुच्या करूं शकते, पण एवढ्यांतच हा प्रकार संपत नाहीं. आईबाप विचारशून्य बनून एखाद्या वेड्याविद्या, अजागळ किंवा बुळकट मुलाच्या गळ्यांतही, आपली सोन्यासारखी मुलगी केव्हां केव्हां बांधितात; मुलाचे आईबापही, ‘मुलाचे दोन हातांचे चार हात करणें हें आपलें कर्तव्य आहे,’ या नादानें, आपल्या अजागळ व संसारास निरुपयोगी मुलाचे, दोन हातांचे चार हात-असल्या सुरूप मुलींस नाडून,-त्या बिचाच्यांस न विचारतां,-ह्यांच्या इच्छेविरुद्ध, आपल्या डोळ्यांस पडदे बांधूनमोठ्या-थाटामाटानें,-करून घेतात; व आमच्या बाळ्यास मुलगी पण मुलगी मिळाली, अशा फुशारक्या मारतात. सुना वयांत येऊँ लागल्या व बाळ्याचे लक्ष तिकडे जात नाहींसें दिसलें, म्हणजे आपल्या मनांत खजील होतात, पण असे प्रकार होतां होई तों न होऊं देणें चांगलें. ४० ‘यः सुंदरस्तद्धनिता कुरूपा' या सुभाषिताचा दाखला घेऊन आपल्यास पळण्यास मार्ग शोधीत बसणें चांगलें नाहीं. विवाहाचा हेतु विवाहित जोडप्यास सुख व्हावें, हा पहिला; त्यांनीं चमोचरणानें वागावें, हा दुसरा; व त्यांच्यापासून समाजांत सुसंततीची भर पडावी, हा तिसरा. नवराबायको यांचे एकमेकांवर प्रेम नसलें, तर पुढल्या गोष्टी होण्याची आशाच खुटेल. त्यांचे एकमेकांवर प्रेम बसण्यास, त्यांच्या खरूपांत कांहीं तरी साम्य पाहिजे. तें साधणे हें आईबापांचे कर्तव्य आहे. केवळ खरूपावर सर्व मदार ठेवावी असें कोणाचे म्हणणें नाहीं, पण साधारणपणें उभय