या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? आईबापांचा मित्र. निपजेल? रोगी व दुखणेकरी आईबापांची संतति निरोगी कशी उत्पन्न होईल ? ‘आडांत असेल तर पोहच्यांत येईल' ल्याप्रमाणेच जें तेज बापांतच नाहीं, तें लेंकांत तरी कोठून उत्पन्न होईल ? याला अपवाद आढळणार नाहीं, असें नाहीं, पण साधारणपणे ह्या गोष्टी ख-या आहेत. कोणत्याही गोष्टीला केवळ एकच कारण पुरेसें नसतें, त्याला दुसरी अनेक कारणें असतात, त्याप्रमाणे येथेही आहे. कांहीं असलें तरी ‘उद्धरेदात्मनात्मानं’ हें गीतावाक्य आपण लक्षांत ठेविलें पाहिजे. आपली योग्य सुधारणा व्हावी, शरीरबळ वाढावें, आपल्यास सद्गुण प्राप्त व्हावे, अशी आपली इच्छा असल्यास, त्याकरितां आपण जिवापाड श्रम केले पाहिजेत. कारण त्यापासून आपला फायदा होऊन आपल्या संततीचाही फायदा होणार आहे. जे गुण आपल्यांत असतील, तेच गुण आपल्या संततीत अधिक परिणतावस्थेस पॉचण्याचा पुष्कळ संभव असतो, व सद्गुणांच्या मानानें जीवितयात्रा अधिक सुखकारक होते; याकरितां आईबापांनी आपली सुधारणा करण्याकरितां काय करावें, याचा विचार करूं. १ आईबापांनीं इंद्रियनिग्रह करावयास शिकावें. १ इंद्रियनिग्रह करावयास शिकणे हा या सुधारणेचा पाया आहे. आपल्या मनास आळा घालतां आल्याशिवाय, कोणताही सद्गुण ग्रहण करितां येणार नाहीं किंवा दुर्गुण टाकतां येणार नाहीं. १ सर्वे श्लोक असा आहे: उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् । आात्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः । याचे भाषांतर वामन पंडितांनी असें केलें आहे:उद्धरावें स्वचित्ताला प्रपंचीं बुडवू नये । मित्र हें आपुलें चित्त शत्रूही चित्त आपुलें ॥ भ. गी. अ. ६ ठो. ५