या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला, రీ इंद्रियनिग्रहाशिवाय आपली शरीरसंपत्ति सुदृढ राहावयाची नाहीं, व ती सुदृढ असल्याशिवाय चांगली संतति आपल्या दृष्टीस पडावयाची नाहीं. चांगल्या संततीपासून लाभणारें अद्वितीय सुख पाहिजे असेल; मुलें चेंडूसारखीं तेजस्वी, चपळ हवीं असतील; तर आपण विषयसुखाचें सेवन माफक केलें पाहिजे. एक सुख सोडावें तेव्हां दुसरें सुख आपल्यास मिळेल. इंद्रियनिग्रह हें सर्व सुखाचे साधन आहे. मनु म्हणतो: इंद्रियाणां प्रसेगेन दोषस्रुच्छल्यसंशयम् । सन्नियम्य तु तान्येव ततः सिर्द्वेि नियच्छति ॥ मनु—अ. २ श्लोक ९३ **इंद्रियें विषयांच्या ठायीं आसक्त झाल्यानें जीवास दोष प्राप्त होतो, व त्याच इंद्रियांचे नियमन केल्यानें त्यापासून जीव सिद्धि पावती. याकरितां इंद्रियांचे नियमन करावें.” २ नानाप्रकारचीं व्रतें आचरण करावयास सांगण्यांत धर्मग्रंथ लिहिणारांचा हेतु, इंद्रियनिग्रह साधावा, हाच आहे. ब्रह्मचर्याचा काल वाढवावा, साधल्यास आजन्म ब्रह्मचर्यं पाळावें, असें सांगण्यांत इंद्रियनिग्रह साध्य व्हावा, हाच हेतु आहे. ऋतुकालीं स्रीशीं गमन करावें, हें सांगण्यांत हाच प्रधान हेतु आहे. मनु म्हणतो: ऋतुकूलाभूिगामी स्यात्खदारनिरतः सदा । पर्ववर्ज व्रजेचैनां तड्रतो रतिकाम्यया ॥ मनु-अ. ३ श्लोक ४५ “स्रीचे ठायीं ऋतुकालीं पर्वदिवस (अमावास्या, अष्टमी, पौर्णमासी, चतुर्दशी, आणि सूर्यसंक्रांति ) वज्र्य करून गमन करावें. सर्वदा आपल्या स्रीच्या ठायीं निरत असावें. भार्याप्रीति संपादनरूप व्रत धारण करणारानें संभोगाच्या इच्छेनें पवैदिवस वज्यै करून स्त्रीगमन करावें.' ३ या एका श्लोकाचा नीट विचार केल्यास गृहस्थांस पुष्कळ फायदा होण्यासारखा आहे. स्रियांनीं पतिव्रताधर्मानें वागावें,