या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. १३ ल्यास सामथ्र्य असेल त्या मानानें आपण चांगलें अन्न खाल्ले पाहिजे. साधे पण खच्छ कपडे वापरले पाहिजेत. ताजी व खच्छ हवा मिळेल तेवढी मिळवावी. व्यायामाची हयगय करूं नये. वयोमानाप्रमाणे सर्व गोष्टींत फरक करावा. भलतेसे पदार्थ आपणांस आवडतात, किंवा सोसतात, म्हणून खाणें चांगलें नाहीं. प्रकृति निरोगी असतांना असले पदार्थ आरंभीं सोसतात, पण पुढे तेच पदार्थ जाचणारे होऊन, शरीरांत अनेक रोग उत्पन्न करितात, पूर्वी आमची प्रकृति निरोगी होती, पण आतां पोटदुखी, कपाळदुखी, किंवा असेच कांहीं दुसरे रोग जडल्यामुळे ती फार अशक्त झाली, असें सांगणारे पुष्कळ लोक आपल्यास आढळतील; पण हीं दुखणीं त्यांस उगीचच्या उगीच जडलीं काय ? असें कधींही ह्मणतां यावयाचें नाहीं. हें सारें बहुधा त्यांच्या अनियमित वर्तनाचे फळ असतें. एखादा रोग जसा हळूहळू कमी होतो, तसाच तो हळूहळू वाढतो. अमुक विकार आपल्यास जडेल, असें वाटल्यास वेळच्यावेळीं जपल्यास तो वाढणार नाहीं, न जपल्यास वाढेल. वडिलार्जित शरीरसंपत्तीच्या * बळावर कांहीं दिवस निभावलें, तरी अनियमित वर्तनाचा परिणाम उतार वयांत आपल्यास, व पुढील संततीस सर्वकाळ, बाधक होण्याचा पुष्कळ संभव आहे. ३ सरकार आपलें रक्षण करणारें आहे, ह्मणून आपण कमकुवत होणें चांगलें नाहीं. आपण सशक्त असलों ह्मणजे आपलें रक्षण आपण करूं, व वेळेवर सरकारासही आपण मदत करू शकुं. समाजांतील सर्व किंवा बहुतेक व्यक्ति दिवसानुदिवस अशक्त बर्नू लागल्यास तो समाज नामशेष होईल. निजीव मनुष्यांच्या समुदायापासून कोणतेंही पराक्रमाचे काम होणार नाहीं, याकरितां प्रत्येक व्यक्तीनें आपली प्रकृति निकोप राखण्याचे प्रयत्न करावे. ४ पूर्वीची व हल्लींची स्थिति यांत पुष्कळ अंतर पडलें आहे. पूर्वीपेक्षां सुखाचीं साधनें हल्लीं वाढली आहेत. पण सुखाचीं सा धनें द्रव्याशिवाय मिळणे शक्य नाहींत, यामुळे दिवसेंदिवस मनु २