"गणपतीची आरती/उठ उठ रे उठ गणराया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[गणपतीची आ...
(काही फरक नाही)

१०:३५, ९ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem> उठ उठ रे उठ गणराया तुज आवडता, मोदक घे खाया॥ध्रु०॥

पुर्वेस तिष्ठली सूर्याची किरणे दव ओली झाली दुर्वांची कुरणे तुझविन जास्वंदी रुसली रे फुलाया उठ उठ रे उठ गणराया॥१॥

बघ आकाशी चंद्र गेला विलयाला तुझ ओवाळीत ये रवी उदयाला उठ उठ रे उठ जगाचे तम साराया उठ उठ रे उठ गणराया॥२॥

तुज संगे खेळाया जमले बघ रे गण भावे आनंदे उत्सवती तुझाच रे सण ह्या भक्तांची दु:खे ने विलयाला उठ उठ रे उठ गणराया॥३॥

<poem>