"शंकराची आरती/जय देव जय देव जय शंकर सांबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[शंकराची आ...
(काही फरक नाही)

११:१८, ९ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

जय देव जय देव जय शंकर सांबा ॥
ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥

जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥
पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥
भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥
अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥

जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ॥
सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥
प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ॥
हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव० ॥ २ ॥

गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥
भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥
करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका ।
तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥ ३ ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.