"शंकराची आरती/कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[शंकराची आ...
(काही फरक नाही)

११:१९, ९ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा ।
उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा ।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥

कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न हो‍उनि पावसि भक्ताला ॥ ध्रु० ॥

ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी ।
जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.