"दत्ताची आरती/ आरती दत्तराजगुरुची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२३:१४, १३ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

आरती दत्तराजगुरुची । भवभयतारका स्वामीची ॥ धृ. ॥

दिगंबर, उग्र ज्याची मूर्ती । कटिवर छाटि रम्य दिसती ॥ चर्चुनि अंगिं सर्व विभुती । कमंडलु धरोनियां हाती ॥ चाल ॥ पृष्ठी लोळे जटेचा भार । औदुंबरतळी, कृष्णेजवळीं, प्रभातकाळीं, वर्णित भक्त कीर्ति ज्याची॥ दिगंतरी वाहे कीर्ति ज्याची ॥ आरती. ॥ १॥

अनुसयेच्या त्वां पोटी । जन्म घेतला जगजेठी ॥ दिव्य तव पादभक्तिसाठी । जाहली अमित शिष्यदाटी ॥ चाल ॥ राज्यपद दिधलें रजकाला । जो रत जाहला, त्वत्पदकमला, किमपि न ढळला, पाहुनि पूर्ण भक्ति त्याची ॥ अंती दिली मुक्ती त्वांची ॥ आरती. ॥ २ ॥

सती तव प्रताप ऎकोनी । आली पतिशव घेवोनी ॥ जाहली रत ती तव चरणी । क्षणभंगुर भव मानोनी ॥ चाल ॥ तिजला धर्म त्वांचि कथिला । जी सहगमनीं, जातां आणुनी, तीर्थ शिंपुनी, काया सजिव केलि पतिची ॥ आवड तुज बहु भक्तांची ॥ आरती. ॥ ३ ॥

ऎसा अगाध तव महिमा । नाही वर्णाया सीमा ॥ धनाढ्य केला द्विजोत्तमा । दरिद्र हरुनी पुरुषोत्तमा ॥ चाल । नेला तंतुक शिवस्थानी । वांझ महिपिसी, दुग्ध दोहविसी, प्रेत उठविसी काया बहुत कुष्ठि ज्याची ॥ केली पवित्र ते साची ॥ आरती. ॥ ४ ॥

ठेवुनि मस्तक तव चरणी । जोडुनि दामोदर पाणी ॥ ऎसी अघटित तव करणी । वर्णू न शके मम वाणी ॥ चाल ॥ अहा हें दिनानाथ स्वामिन् । धाव दयाळा, पूर्ण कृपाळा, श्रीपद्मकमळा परिसुनि विनंती दासाची ॥ भक्ती दे त्वत्पदकमलाची ॥ आरती. ॥ ५ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.