"दत्ताची आरती/ जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:०७, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा । अनुसया निजबालक म्हणविसी जगमित्रा ॥ जगदुद्‌भ वातिप्रलयां कारण आदिसुत्रा । ब्रह्म चिदंबर सुरवरवंद्य तूं सुखवक्त्रा ॥ १ ॥

जय देव जय देव जय दत्तात्रेया श्रीदत्तात्रया । भवहर वंदित चरणां सद्‌गुरुवर सदया ॥ धृ. ॥

भक्तिज्ञान विरागास्तव हे सन्मूर्ती । नरसिंहा दिक म्हणविसि अपणा सरस्वति ॥ यतिवर वेषा धरुनी रक्षिसि धर्मरिती । दर्शनस्पर्शनबोधें पावन हे जगती ॥ जय देव. ॥ २ ॥

विधिहरि शंकररुपा त्रिगुणात्मक दीपा । सच्चिन्मय सुखरुपा केवळ अरुपा । स्थानत्रय देहत्रय तापत्रय कुणपा । विरहित सर्व अपाधी निर्गत भवतापा ॥ जय. ॥ ३ ॥

अगणित प्रलयांबूसम चिद्‌घन रुप तुझें । बुब्दुवत जग सर्वहि जगदाभास सुजे ॥ विवर्त सिद्धांत हे मृषाचि सर्व दुजे । अर्द्वता करिं पावन निर्भय पादरजें ॥ जय. ॥ ४ ॥

अज्ञानां धसमुद्रा करि शोषण भद्रा । अनादि जीव कुनिद्रा पळविं तूं अमरेंद्रा । निजजनच कोरचंद्रा अवगुण जडतंद्रा । नाशय कुबुद्धि मौनी वंदित पदमुद्रा ॥ जय. ॥ ५ ॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.