"दत्ताची आरती/ नृसिंहसरस्वती । मनि धरुनियां प्रीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१४, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

नृसिंहसरस्वती । मनि धरुनियां प्रीती ॥ ओवाळीतों शेजारती । अंगीकाराया श्रीपती ॥ धृ. ॥

ब्रह्मा येउनि देव देवा । म्हणे कोण कोण जीवा ॥ उपजवूं कोठे केव्हां । संदेश हा मज व्हावा ॥ नृसिंह. ॥ १ ॥

विष्णुही येऊनीयां । आज्ञा मागे वंदुनियां । कोण जीवा काय । खाया कैसे देऊं कवणे ठाया ॥ नृसिंह.॥ २ ॥

येऊनियां महादेव । वंदूनीया पादद्वंद ॥ ज्ञान कोणा देऊं देवा । आज्ञा करा स्वयमेवा ॥ नृसिंह. ॥ ३ ॥

अंबा म्हणे बाळ यती । फार झाली असे राती । झोंप आलीं तुजप्रतीं । भक्त रक्षुनी श्रम होती ॥ नृसिंह. ॥ ४ ॥

विनविती भक्तवृंद । सेवा घेउनिया छंद ॥ पुरवुनि दे ब्रह्मानंद ॥ भीमाप्रौत्रानंदकंद । नृसिंह. ॥ ५ ॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.