"दत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१६, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

विडा घेई नरहरिराया । धरूनी मानवाची काया । यतिवेष घेउनीयां वससी दीनांसी ताराया ॥ धृ. ॥

ज्ञान हें पूगीफळ । भक्त नागावल्लींदळ ॥ वैराग्य चूर्ण विमळ । लवंगा सत्क्रिया सकळ ॥ विडा. ॥ १ ॥

प्रेम रंगीत कात । वेला अष्टभावसहीत ॥ जायफळ क्रोधरहीत । पत्री सर्व भूतहीत ॥ विडा. ॥ २ ॥

खोबरें हेचि क्षमा । फोडुनि द्वैताच्या बदामा । मनोजय वर्ख हेमा । कापूर हे शांतिनामा ॥ विडा. ॥ ३ ॥

कस्तुरी निरहंकार । न मिळती हे उपचार ॥ भीमापौत्र यास्तव फार । सत्वर देई वारंवार ॥ विडा. ॥ ४ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.