"दत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:२९, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी । शरण आलो तुला देवा भक्तीने हा मी ॥ धृ. ॥

तारीं तारीं स्वामी आतं बुडतो भवडोहीं । अहंभाव जाळुनि माते कृपेने पाही ॥ १ ॥

शुद्धभाव देऊनि मज लावीं तव भजनीं । प्रपंची त्रासलो यांतुनि काढावे क्षणीं ॥ २ ॥

तवगुणलीळा नित्यनिरंतर ऎकवी श्रवणी । हाची वर मजला द्यावा श्रीगुरुमूर्तीनीं ॥ ३ ॥

मोरेश्वरसुत वासुदेव हा करितो तव सेवा । स्वामि समर्था देई यांसी भक्तीचा ठेवा ॥ ४ ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.