"दत्ताची आरती/ येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:३०, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी । भक्ति भावे सेवा करितां पावसि भक्तांसी ॥ धृ. ॥

महिमा किती वर्णू मी तरी पामर मतिहीन । सेवेकरितां चरणी आलो निरसी अज्ञान ॥ १ ॥

नानारोग दुरितें जाती घेतां तव तीर्थ ॥ प्रपंच टाकुनि साधायासी आलो परमार्थ ॥ २ ॥

सेवक मी गुरुराया तुमचा शरणांगत चरणी । जीवन्मुक्त व्हावया तत्व उपदेशी कर्णी ॥ ३ ॥

मोरेश्वरसुत वासुदेव हा स्वामीगुण गाई । निश्चय माझा राहो देवा अखंड गुरुपायीं ॥ ४ ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.