"दत्ताची आरती/ जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:३२, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो । तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो ॥धृ०॥

जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो । कर जोडुनियां नमितों सहस्त्र वेळां, या अवतारा हो । जैशा दिनकरउदयीं लोपति गगनीं असंख्य तारा हो । तैशा अपदा हरती मुखिं निघतांची अक्षरें तारा हो । तूं स्मरगामी स्वामी विटलों या मी तापत्रया हो ॥१॥

तूं महायोगी अर्धांगस्त्रीधारी हे मदनारी हो । तूं नट नरनारायण नारायणि नर तूंचि नारी हो । तूं रघुवीर, श्रीनरहरी, हिरण्यकश्यपुहृदयविदारी हो । ब्रह्मचारी तूं ब्रह्मचि, राधाकृष्ण जय कुंजविहारी हो । तूं दाता, तूं त्राता, तूंचि विधाता, मुनि आत्रेया हो ॥२॥

तूं भक्तां कित जैसी जैसी भक्तीधची भावना हो । तैसी तैसी करणी करणें पडे तुज जगजीवना हो । जिकडे पाडस अळवी तिकडे हरणी धांव घे वना हो । उदंड देसी परंतु प्रसाद पदरीं मज घेवेना हो । विश्वदरुपासी पाहाया करि पार्थापरि सुपात्र या हो ॥३॥

प्रसन्नवदन सुशोभित कोमल घननीळ तनु साजिरी हो । जटा-मुकुट कुंडलें माळा पीतांबर भरजरी हो । केशरी गंध सुचंदन पुष्पें तुलशीदल मंजरी हो । दंड कमंडलुमंडित कृष्णाजिन डमरु खंजिरी हो । आनंदघन स्वरुपाला देवा कधीं पाहतिल नेत्र या हो ॥४॥

सद्‌गुरु माउलि, कृपेचि साउलि धरि तूं दयाळु गडे हो । ये आई म्हणतां येसी लगबग नेसुनिया लुगडें हो । जरि झांकिसि तूं एवढें मातें बाळ तुझें उघडें हो । विष्णुदास म्हणे तरि झडतिल कीर्तीचे चौघडे हो उदंड कविच्या वदनीं सतत वाजतील वाजंत्र्या हो ॥५॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.