मुख्य मेनू उघडा

विकिस्रोत β

शुभ्र बुधवार व्रत/नऊ ग्रहांतील बुध

< शुभ्र बुधवार व्रत
template error: please do not remove empty parameters (see the style guide and template documentation).

<poem>


नऊ ग्रहांतील बुध

आपल्याला नऊ ग्रह माहीत आहेत. ते म्हणजे

१. रवी,

२. सोम.

३. मंगळ.

४. बुध

५. गुरू,

६. शुक्र.

७. शनी

८. राहू

९. केतू.

त्यांपैकी आपल्याला फक्त बुध या ग्रहाचा विचार येथे शुभ्र बुधवारच्या व्रताच्या माहितीसाठी करावयाचा आहे.

पहिले स्थान यात बुध असल्यास तो माणूस विद्या शिकण्यात आयुष्य घालवतो; शरीराने सुंदर असतो; तो जे काम हातीं घेईल ते तडीस नेतो. ही व्यक्ती कोणाचाही द्वेष करीत नाही. ही व्यक्ती लिहिण्याचा म्हणजे पुस्तके लिहिण्याचा आणि पुस्तके प्रकाशित करण्याचा धंदा करते; अशी व्यक्‍ती निरोगी असते; या व्यक्तीने वैद्यकीचा व्यवसाय केला, तर त्याला वैद्यकीमध्ये यश मिळते.

दुसरे स्थान यात बुध असल्यास ही व्यक्‍ती बोलकी असते. वयाच्या बत्तिसाव्या वर्षापासून ही व्यक्‍ती श्रीमंत होते. मात्र आशा व्यक्‍तीने दलालीचा, लेखनाचा अगर प्रकाशनाचा धंदा करावा.

तिसरे स्थान यात बुध असला तर हा माणूस नातेवाइकांना प्रिय होतो व त्यांच्यापासून त्याला सुख मिळते. तो ज्योतिष जाणणारा असतो.

चौथे स्थान यात बुध असल्यास प्रवासात लाभ होतो.

पाचवे स्थान यात बुध असल्यास गायन, वादन व लेखन यांचा त्याला नाद असतो. पत्‍नी व पुत्र यांच्यापासून त्याला सुख मिळते.

सहावे स्थान यात बुध असल्यास त्याला शत्रू नसतो. त्याला आजोळचे सुख मिळते. चविष्ट पदार्थ खाणारी व पिणारी ही व्यक्‍ती असते.

सातवे स्थान यात बुध असल्यास जोडीदार प्रामाणिक मिळतो. धंद्यात भागीदारी प्रामाणिक मिळतात.

आठवे स्थान यात बुध असल्यास माणूस नम्र आणि श्रीमंत असतो. त्याला अधिकारयोग येतो.

नववे स्थान यात बुध असल्यास बत्तिसाव्या वर्षापासून भाग्योदय होतो. ही व्यक्‍ती विद्वान असते. संपत्ती, संतती आणि जोडीदार यांपासून अशा व्यक्तीला सुख मिळते.

दहावे स्थान यात बुध असल्यास ती व्यक्ती गोड बोलणारी असते. आणि संतती-संपत्तीबाबतही सुखी असते. तिच्या वयाच्या एकोणतिसाव्या वर्षापासून भाग्योदय होतो.

अकरावे स्थान यात बुध असल्यास ही व्यक्‍ती आमरण सुखी माणूस असते. त्यांना गायनाची आवड, ज्योतिष, सामुद्रिकशास्त्र, शिल्पकाम व अनेक कला येतात. पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांचा भाग्योदय होतो.

बारावे स्थान यात बुध असल्यास चांगले फळ मिळत नाही. वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी जोडीदाराचा नाश होतो.

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg