मराठी विकिस्रोत या आंतरजालावर असलेल्या मुक्त ग्रंथालय प्रकल्पाचा परिचय करून देणारे साहाय्य-पान आहे. विकिस्रोतावर आपण नवखे असाल, तर कृपया सर्वप्रथम हे पान वाचा.

विकिस्रोताविषयी

विकिस्रोत म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोत हा विकिपीडियाप्रमाणेच संपादनासाठी सर्वांना खुला असलेला प्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो.