सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १९०१ ते २०००
<poem> हें सत्य सत्य त्रिवाचा पूर्ण । जीवचि ब्रह्म यथार्थ ॥१॥मुख्य आत्मा म्हणावें आपणासी । आपण तें ब्रह्म अविनाशी । प्रत्यगात्म ब्रह्म निश्चयासी । सदृढ धरावें ॥२॥येथें जेणें अभाव कल्पिला । अथवा संशयीं वाउगा पडला । तो सत्य सत्य जाणावा बुडाला । मायामृगजलीं ॥३॥जे गुणदोष आणि रूपाहूनी । चित्प्रभा निरोपिली पूर्णपणीं । तेचि आत्मत्व ब्रह्मत्व ऐक्यपणीं । येर अनात्मजात बत्तीस श्रुति युक्ति अनुभवयुक्त । बोलतां कोणतें अयुक्त । ऐसा आमुचा अर्थसिद्धांत । तेथें कोणी शंका करी ॥५॥कीं अन्न प्राण मन विज्ञान । आनंदादि कोशांसिही संपूर्ण । श्रुति युक्ति अनुभव प्रमाण । तरी अनात्मत्व कैसें ॥६॥अहं ब्रह्म प्राण ब्रह्म । मन ब्रह्म विज्ञानही ब्रह्म । आनंद ब्रह्म ऐसा हा नेम । श्रुतीच करी ॥७॥ऐसें पंच कोशांसिही श्रुति । ब्रह्मत्व वाखाणी निश्चितीं । याची अर्थाविशीं युक्ति । असे तें दाऊं ॥८॥सर्व भूतें अन्नापासूनी जाहलीं । आहे तों अन्नेंचि वांचलीं । लयासी पावलीं । अन्नामाजी ॥९॥तैसेंचि प्राणापासून सर्व जाहलें । प्राणामुळें वांचलें मेलें । मन असतां उद्भवलें राहिलें । शेवटीं लयही मनीं ॥१९१०॥ऐसेंचि विज्ञान आनंदापासूनी । उद्भवल्या राहती भूतश्रेणी । लयही पावताति निर्वाणीं ऐशी युक्तिही असे ॥११॥श्रुति युक्ति ही प्रमाण जैशी । तेवीं अनुभूति बोलिजे अल्पशी । मी देह वाटतसे सर्वांसी । मीच क्षुधातृषायुक्त ॥१२॥मीच संकल्पविकल्पात्मक असें । मीच निश्चयही करीतसें । मीच सुखरूपपणें वसें । हा अनुभव सर्वांचा ॥१३॥तस्मात् श्रुतियुक्त अनुभव । युक्तचि पंचकोशांसी ब्रह्मत्व ।ऐसें असतां अनात्मत्व । पंचकोशां केवीं ॥१४॥ऐशी शंका जरी सप्रमाण । केली श्रुति युक्ति अनुभवेंकडोन । तरी याचें उत्तर ऐका सावधान । बोलिजेत असे ॥१५॥अरे अन्न प्राण मनादिकांसी । श्रुति बोले सायासीं । तिचें रहस्य न कळे अल्पांसी । विचारवंत जाणती ॥१६॥ज्याच्यापासून हे सर्व जाहलें । आणि जेथेंचि राहून मेलें । तेंचि ब्रह्म सर्व नाथिले । भूतजात ॥१७॥भूत म्हणिजे निर्माण जाहलें । ईशादि तृणांत जाहलयांत आलें । भूतांवेगळें तें एकचि उरलें । तेंचि परब्रह्म ॥१८॥तेंचि ब्रह्म कळावें साधकां । हाचि श्रुतीनें घातला आडाखा । कीं भूतादि परता तया एका । स्वानुभवें जाणावें ॥१९॥ऐसें हें जाणावयाचें स्थान । श्रुति माउली दावी आपण । परी हे जीव एका वचनेंकडून । ब्रह्मत्व जाणतीना ॥१९२०॥तेव्हां श्रुति ते पुन्हां मागुति । सांगती जाहली जीवाप्रति ।कीं लय राहणें सर्वांची उद्भुति । तें ब्रह्म कोणतें विचारा तेंव्हा विचारही पाहतां करून । परी जीवा न कळे यारीतीं कोण । मग म्हणे अन्न प्राण मन । विज्ञान आनंदही असे हेंही बोलावयाअसे कारण । कीं विचारवंत अधिकारी कोण । कळेल अनायासें जो विचारहीन । गुंतेल सुटेल येर यास्तव हेतु जो कां आपुला । यथार्थ तो प्रगट नाहीं केला । तोचि अडाखा एथें बैसविला । यया पंचकोशांवरी ॥२४॥कीं अन्नादि आनंदांत संपूर्ण । भूतें जाहलीं पांचांपासून । वांचती शेवटीं पावती मरण । या पांचामाजीं ॥२५॥ऐसा संकेत करून श्रुति । उपदेशीत असे जीवाप्रति । म्हणे पहारे विचारून चित्तीं । यांत खरे ब्रह्मत्व कोणतें ॥२६॥मग आपुलाले बुद्धीऐसे । विचार करिते जाहले मानसें । जे जे विचारासी पात्र जैसे । ते ते निश्चय करिती तैसा ॥२७॥कोणी अन्नमयचि ब्रह्म म्हणून । बैसले पावले दृढबंधन । तैसेचि प्राण मन विज्ञान । ब्रह्म निश्चयें स्थापिती ॥२८॥हें असो आनंदमयासी । ब्रह्मत्व कल्पिती जे मानसीं । तेही न पावती मुक्ततेसी । मा येर निश्चया मोक्ष केवीं ॥२९॥हेंचि श्रुतीचें घेऊन वचन । गुरुत्वें सांगें चतुरानन । तेणें इंद्र आणि विरोचन । निश्चय करिती द्विविध ॥१९३०॥विरोचनें अन्न ब्रम्ह कल्पिलें । देहासीच आत्मत्व दृढ केलें । देहपातांती मोक्ष मानिलें । ते सुटले न म्हणावें ॥३१॥तयाचा सहाध्यायी इंद्र । चारी वेळां जाऊन सत्वर । मुख्य ब्रह्माचा करून निर्धार । मुक्त जाला येर त्यागें ॥३२॥ऐसाचि भृगुही वरुणाप्रती । पंचवेळां विचारून चित्तीं । आत जाईला तेणें जीवन्मुक्ति पावला सत्य निर्धारें ॥३३॥तस्मात् श्रुतीनें अधिकार । पाहिला जीवाचा अल्पमात्र । म्हणून केला असे उच्चार । पांचांसी ब्रह्मत्वाचा ॥३४॥येरव्हीं पांचकोशांसी ब्रह्मत्व । श्रुति बोलेना अघटितत्व । बोले तरी कैचें महत्त्व । श्रुतीसी उरलें ॥३५॥एक ब्रह्म अद्वयही म्हणत । आणि पांचांलागीं ब्रह्मत्व स्थापित । तरी कां मदिरा पिऊन । जाहली उन्मत्त । विरोधि प्रलाप करी ॥३६॥परी ते श्रुति उन्मत्त नसे । हे अविचारी आपुलाले बुद्धीऐसे । स्वतां भ्रमीं आणि लाविती पिसे । श्रुति बरळ म्हणोनी असो तया मुढासी काज काय । नेणती भवचा तरुणोपाय । आपण बुडोन श्रुतीवरी अपाय । विरोधाचा घालिती जरी मूढ विरोध श्रुतीसीं । ठेवितां उणीव नये तिसी । हें ज्ञाते जाणती बंधन येरासी । कल्पांत दृढ होय ॥३९॥तस्मात् ब्रह्मत्व पंचकोशांसी । यथार्थ न बोले श्रुति अल्पसी । तरी अनात्मया ब्रह्मत्व कल्पना कैशी । करिती मूढ एवं श्रुति प्रमाण होतें मानिलें । तें विरोधास्तव व्यर्थ गेलें । आतां युक्तीनें पंचकोशां ब्रह्मत्व आणिलें । तेंही निर्दाळूं अन्नापासून सर्व जाहलें । अन्न तो पृथ्वीसी असे बोलिलें । आणि देहासीच ब्रह्मत्व कल्पिलें । कासयावरुनी ॥४२॥या देहापासून जाहलें सर्व । कीं सर्व वांचलें या देहास्तव । कीं लय पावलें स्वयमेंव । एका देहामाजीं ॥४३॥पृथ्वीपासूनही जाहलें म्हणतां । विरोध बहुत तत्त्वता । जाहलें तया असे भौतिकता । येर भूता उद्भव केवीं ईशादिकांसी कोण कारण । तें तों राहिलेंचि मुख्य अधिष्ठान । परी आकाशादि हे जाहले कोठून । पृथ्वी तों आपकार्य तैशींचि प्राणापासून सर्व । जाहलीं म्हणतां भूतें अपूर्व । तरी काय जाहला असे उद्भव । एकाच्या प्राणापासूनी आपोमयता असे प्राणासी । यास्तव आपीं उद्भव जरी कल्पिसी तरी ही उत्पत्ति नव्हे सर्व भूतांसी । खाणी मात्र उद्भवती मनापासून जाहलें म्हणावें । तरी मनासी भूतांचि रचना नव्हे । मन उद्भवता अमुकसें कल्पावें । परी रूपें पहिलीं असतीं तैसाचि बुद्धीनें जाहलियाचा । निश्चय करावा अमुक साचा । परी बुद्धीपासूनियां सर्वांचा ।उद्भव नव्हे ॥४९॥तस्मात् विज्ञानाचि ब्रह्म ऐसें । हें कल्पांतींही न घडे अल्पसें ।आतां आनंदमयीं कारणात्व असे ।परी एका पिंडीचिया नाहीं । ॥५०॥एकाच्या सुखें सर्व न होती । एकाच्या सुखें सर्व न राहती । एकाच्या सुखामाजीं न सांठवतीं । अंतकाळी ॥५१॥एकाचें सुख तें प्रवेशानंतर । मग हो कां ब्रम्हादि कीटकांत समग्र । परी तेथून नव्हे भूतांचा विस्तार । जरी आनंदमय तेथें ॥५२॥त्या आनंदमयीं विद्या अवद्यिा दोन्ही । तिजी स्फूर्ति मायारूपिणी ।जीवेश तेथें प्रतिबिंबोनी । राहिले असती ॥५३॥इतुक्यासह जो आनंदमय । प्रवेशाउपरि तो व्यष्टिरूप होय ।प्रवेशापूर्वीं जो समाविष्टमय । तेथून सर्व भूतें जाहलीं एथें कोणी विरोध मानिती ।कीं ईशासहित देहींच वस्ती । बाहेरी नसे ऐशी ववचनोक्ति ।पूर्वींची असतां ॥५५॥तरी याचें उत्तर तें ऐसें । देहाबाहेरी तों स्फूर्त्यादि नसे । परी जों काल खाणींत न प्रवेशे । आणि न होती निर्माण ॥५६॥खणीच मुळीं निर्माण नसतां । प्रवेश केवीं होय आंतौता ।परी भूतें पंचीकृत अपंची कृतता । पूर्वींच जाहली असती ॥५६॥पूर्वीं भूतसूष्टि जाहली म्हणून । तयासी मायास्फूर्ति असे कारण ।तोचि आनंदमय समसृष्टिमय पूर्ण । जीवेशविद्याअविद्यात्मक ॥५८॥तो साकारापूर्वीं केवीं असे । हे शंकाचि कोणीं न कीजे मानसें ।या मायादेवीचे स्वभावचि ऐसे । अघटन घडवावया ॥५९॥असो आनंदमय जो समाविष्टमय । तेथून हें सर्व जाहलें भूतकार्य ।अविद्याप्राधान्यें उत्पादान होय । विद्याप्राधान्यें निमित्त जरी कारणत्वया आनंदमया ।असतां ब्रह्मत्व न म्हणे श्रुति तया । ऐशियाही पहावें तात्पर्या ।विचारवंतें ॥६१॥माया अविद्या जीव शिव । पांचवी मायास्फूर्ति स्वयमेव ।हें निर्माण जाहलें जें रूपनांव । तें भूतांत आलें ॥६२॥हें इतूकेंही कोठें उद्भवती । तें अधिष्ठान ब्रह्म निश्चिती ।जेथून या सर्वांची लय स्थिति उत्पत्ति । तें अभिन्न करण एक ॥६३॥अभिन्न करण नव्हे ईश्र्वर । उपादानेंविण निमित्तमात्र । तेवींच निमित्तेंविण माया अनेश्र्वर । उपादान भिन्नत्वें ॥६४॥तस्मात् माया आणि ईश्र्वरासी । एकचि अधिष्ठान उभयांसी ।तेंचि अभिन्न निमित्त उपादानासी । मुख्य कारण ब्रह्म ऐसें हें श्रुतीचें तात्पर्य ।बोलतसे उत्पत्ति स्थिति लय । या तिहीं कार्यासी जें अद्वय ।तें ब्रह्म एकचि पूर्ण ॥६६॥येर हे बत्तीस अनात्मजात । ते निरोपिले रूपासहित । आणि त्याचे धर्म ते गुणदोषयुक्त । या उभयां अतीत चिति तेंचि ब्रह्म तोचि आत्मा ।ऐक्यत्वविषयीं श्रुत्यर्थसीमा । हेंचि जाणेल तो साधक महात्मा ।खरा मुक्त होय ॥६८॥एवं श्रुति युक्ति अनात्मजातासी । साह्य आरोपिली जेपंचकोशांसी । ते खंडिली मुख्य निर्धारेंशीं । आता अनुभूति कैशी ती पाहूं ॥६९॥देहासी अथवा प्राणासी । मनोमय विज्ञान आनंदासी । आत्मत्व कल्पना जरी सर्वांसी । तरी अवधारावें साधकें ॥७०॥मुळीं अज्ञान जें कां आपुलें ं तेणेंचि अनात्मया भाविलें । हें तों पूर्वींच आह्यीं निरोपिलें तरी हें सत्य कैसें ॥७१॥मदिरा पिऊनियां भुलला । सत्य कोण मानी त्याचे बोलाला ।तैसा देह बुद्धि जो घेऊन बसला । त्याचा अनुभव अनुपयोगी तथापि तया देहात्मवादियासी । पुसावें कीं देहा आत्मा म्हणसी । तरी प्राण मन विज्ञानादिकांसी । आत्मत्व कल्पीसी कां एक आत्मा अससी निर्धार । कीं जाहला अससी पांच चार । ऐसा तो कोठें न देखे प्रकार । जरी उन्मत्तही भ्रमे ॥७४॥स्वप्नीं जरी नाना उद्भववी । परी आपणातें एकचि भावी । दिसती बहुपरी येर आघवीं । दुजीं मजहूनी ॥७५॥उन्मत्तकालीं कीं स्वप्नामाजी । एक रूपा मानिना दुजी ।हे शाहणे केवीं मानिती सहजीं । बहुधा आत्मया ॥७६॥मागुतीं तो देहात्मवादी । म्हणेल मी देह एकचि अनादि । प्राणादि बहुधा कोण प्रतिवादी । आत्मा म्हणोनि ॥७७॥तरी पहा देहाहून प्राण । प्राणाहून मन विज्ञान । हे आवडीचें तारतम्य लक्षण । मागां निरोपिलें ॥७८॥हें तारतम्य सारिखें सर्वांसी । तरी ते आवडी कासया धरिसी ।देहाहून आवडी जरी प्राणासी । तरी प्राण आत्मा अर्थात देहासी अनात्मत्व आलें । कीं प्राण आवडून देहा उपेक्षिलें ।उगेंचि बळें जें आत्मत्व मानिलें । तें उडे आपेआप तैसेंच प्राणाहून मन आवडे । तेव्हां प्राणाचें आत्मत्व उडे । त्याहून विज्ञान प्रीति जोडे । तरी मनही अनात्मा ॥८१॥सुप्तिकाळीं आनंद आवडता । येर बुद्धयादि सारी परता ।ऐसें आवडीचें तारतम्य पाहतां । अकृत्रिम सर्वांसी ॥८२॥ऐसें असतां हे मूढ कैसे । देहात्मवादाचें घेती पिसें ।असो त्या भ्रामका काज नसे । परी सांगावें मुमुक्षा ॥८३॥कीं हें उगेंचि भ्रमें मानिलें । जैसें पुत्रादिकां आत्मत्व कल्पिलें ।स्त्रीसही अर्ध देह बोलिलें । तेवींच देहादिकां ॥८४॥पुत्रादिकां गौणात्मा म्हणावें । देहादिकां मिथ्यात्मत्व समजावें । हें अवघे अज्ञानकृत्य कळावें । जया तरावें वाटे तया ॥अज्ञान म्हणजे मुख्य आत्मयाचें । न कळणें होय स्वकीयत्वाचें ।तेणेंचि देह मी म्हणून नाचे । जन्मावया मरावया ॥८६॥ऐसा मिथ्यात्मयाचा प्रकार । उगाचि मानी असतां पर । जैसा सिंहचि कीं हा असे नर । तेवीं गौणात्मा पुत्रादि ऐसें असतां या अज्ञान जनीं ।पुत्रात्मत्वही न त्यागिती कोणी ।मा देहाचें आत्मत्व त्यागुनी । परते कोण ॥८८॥असो रविदत्ता मुमुक्षूनें । निज स्वहित स्वतां करणें । ब्रह्म आत्मा निःसंशयपणें । येर अनात्मजात सर्व ॥८९॥या पंचकोशांसी श्रुति बोले । ब्रह्मत्व म्हणोनि युक्तीनें स्थापिलें ।जनाचे अनुभवही कल्पिले । परी विचारापुढें तुच्छ विचारितां श्रुत्यर्थही कळे ।तात्पर्य समजून कुतर्क मावळे । हळूहळू अनुभवही निवळे ।विचारवंता श्रवणें ॥९१॥एक मुख्यात्मयाचा निर्धार । तीहीं प्रतीतीनें करावा विचार ।येर अनात्मजात सविस्तर । पंचकोशात्मक बत्तीस जैसें मुख्यात्मया प्रमाणावास्तविक श्रुति युक्ति अनुभवेंकडून । तैसें अनात्मया नसे पहा विचारून। श्रुति युक्ति नानाभूति एवं अनात्मजात पंचकोश । ब्रह्मात्मा एकचि अविनाश ।हा निर्धार झाला परी सारांश । श्रुतिचा निवडू मागुती जया निरुपणें साधकासी ।मुख्यात्मत्व येईल निश्चयासी । आणि अनात्मत्व होईल येरांसी ।देहादि बत्तीसां ॥९५॥तेंचि ऐकावें सावधान । पंचकोशांचें विवेचन । श्रुत्यर्थाचाही सारांश पूर्ण । आकळे स्वानुभवा ॥९६॥अज्ञान देह आत्मा मानिला। जो मांसादिकांचा अन्नमय बोलिला ।अन्नचि ब्रह्म म्हणून नेम केला । परी तात्पर्य भिन्न कोशपंचका पक्ष्याकारता । बोलिलीं पांच पांच अंगें तत्त्वतां । इतुकें सर्व विचारें पाहतां । कळे कैसें अनात्मत्व ॥९८॥अन्नमयाचें हेंचि शिर । हे हेचि पक्ष दक्षिणोत्तर । हाचि आत्मा हें पुच्छ निर्धार । श्रुतीनें केला ॥९९॥ब्रह्म तरी सच्चिद्धन । निर्विकार अदृश्य पूर्ण ।जेथें अमुक म्हणून निर्देश वचन । सहसा न करी श्रुति ॥२०००॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |