वर्गणीबाबतची नोंद-
पत्राची आगाऊ सालीना वर्गणी १ रू.
मुंबईच्या वर्गणीदारास आगाऊ १। रु.
एम. ओ. ने इतरांस १ रु. १४ आणे.
व्हयल्यू पेयेबल मागविल्यास २ रु.
अशी आहे. पुढे त्यात किरकोळ बदल झालेला आहे. गावावरूनही हा वर्गणीचा दर बदलतो. मुखपृष्ठ'वर सुंदर स्त्रीचे चित्रे आहे. आर. एम. टिळक यांनी ते काढलेले आहे. मुखपृष्ठ कमालीचे साधे असून · कमी जागेत 'टायटल लेटरिंगज्' टाकलेले आहे. या अंकात सचित्रता आरंभी नसली तरी नंतर मात्र राजाराणी यांची अकर्षक रंगीत चित्रे आहेत. (करमणूक दि. २३।१२।१९११) कथेलाही चित्र देण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुद्रण आणि छपाईच्या मागासलेपणाची साक्ष त्यात दिसते. चित्राचा मागील भाग संपूर्ण कोरा ठेवून पाने छापलेली आहेत. ' वकिलसाहेबांची होळी' या कथेला चित्र दिले. (करमणूक १०|३|१९०६) हे नमूद करण्याचे कारण त्यावेळच्या मुद्रणाच्या मर्यादांचेही स्मरण असावे एवढेच आहे. जाहिराती, नोटिसा वगैरे संबंधाने ज्यास पत्रे पाठवायची असतील, ती त्यांनी मॅनेजर आर्यभूषण प्रेस पुणे या पत्त्यावर पाठवावी. पत्रात छापण्यासाठी मजकुर पाठविणे. तो रा. रा करमणूक कर्ते आनंदाश्रम पुणे या पत्त्यावर पाठवावा. इतर व्यवस्थेसंबंधाने सर्व पत्रव्यवहार कुळकर्णी आणि मंडळी, बुधवार पेठ पुणे यांच्याकडे करावा, असे तीन भिन्न पत्ते संपर्कासाठी अंकावर दिलेले आहेत.
'करमणूक'चे संपादक हरिभाऊ'-
सुदैवाने हरि नारायण आपटे यांच्यासारखे शिक्षक आणि चतुरस्त्र लेखक, कथा, कादंबरीकार आणि नाटककार 'करमणूक 'चे जन्मदाते संपादक आहेत. त्यामुळे या नियतकालिकाचे स्वरूप विशुद्ध वाङ्म़यीन आणि निखळ करमणूकीचे असून एक अभिरूचि-संपन्न दर्जा त्याला लाभला आहे. समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्वाचे संपादक लाभणे आणि त्यांच्या कसदार लेखणीचा, भाषाशैलीचा आविष्कार सातत्याने होणे हा एक दुर्मिळ योग येथे साधला गेला आहे. हरि नारायण आपटे म्हणजे एक असामान्य समृद्ध वाङ्म़यीन व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एकूण २० कादंबऱ्या, नाटके, ४ स्फुट गोष्टींचे भाग, काही टीका लेख प्रहसने आणि अद्यापही अप्रकाशित राहिलेले सुमारे ८०० पानी साहित्य स्वतःच निर्माण केल होते. जर्मन, फ्रेंच, बंगाली, संस्कृत या भाषा त्यांना मराठी, इंग्रजी, हिंदीबरोबरच अवगत होत्या. त्यांनी संस्था संचालन, वृत्तपत्र संपादन, समाजकार्य केले. 'भारत वर्ष'