पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ अंतरिक्षांतील चमत्कार. महिन्यांतील कित्येक रात्रींत एरवींच्यापेक्षा अधिक तारे पडतांना दृष्टीस पडतात. शिवाय कित्येक वर्षांनी एखाद्या रात्रीं हे तारे इतके पडतात कीं, जणूं काय तान्यांचा पाऊसच पडत आहे असे वाटतें. एप्रिल, आगस्ट व नोवेंबर या महिन्यांतील कांहीं कांहीं रात्रीस हे तारे पुष्कळ पडतात. आणि ताऱ्यांचा पाऊस सुमारें ३३ वर्षांनीं एकवेळ पडतो. सन १८६६ सालीं तान्यांचा मोठा पाऊस पडला होता. आणि आतां लवकरच सन १८९९ या वर्षी हा ताऱ्यांचा पाऊस पडतांना आपणास पहाण्यास सांपडेल. याप्रमाणें पडणाच्या ताऱ्यांचा मोठा चमत्कार आहे. आतां वास्तविक पाहिलें तर ज्यांस आपण तारे समजतों, त्यांपैकीं कांहीं एकादा तारा आकाशांतून तुटून पडत नाहीं. तुटून पडणारे तारे हे खऱ्या ताऱ्यांहून अत्यंत भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत. पडणारे तारे आपणास खऱ्या ताज्यांपेक्षां फारच जवळ आहेत; व ते अतिशय लहानहि असतात. परंतु तारे जे आहेत ते आपल्या पृथ्वीपेक्षांच काय, पण आपल्या प्रचंड देदीप्यमान सूर्यापेक्षांहि अनेकपटीनें मोठे आहेत. तेव्हां खरे तारे आणि पडणारे तारे यांच्यामधील भेद प्रथम लक्षांत ठेवणें अवश्य आहे. हे पडणारे तारे फारच सूक्ष्म आहेत. ज्यांचे व्यास हजारों मैल आहेत असे गुरु, शनि, इत्यादि मोठमोठे ग्रह, आणि शेंड्यांचाच मात्र विचार करितां ज्यांच्या आकाराचा