'सुधारकाचे काम स्वीकारतील तर मी सुधारक आनंदाने त्यांच्या स्वाधीन करीन असे उद्ग़ार काढले होते.
हरिभाऊ सामाजिक सुधारणेला अनुकल असले तरी आगरकरांची परखड आक्रमक शैली त्यांना मान्य नव्हती. समाजाला वाक् बाणांनी विद्ध करून शिकविण्याचा यत्न फसतो असे त्यांचे मत होते. लोक त्यामळे उलट विरोधक होऊन बसतात म्हणून हरिभाऊ कटाक्षाने हे सर्व टाळतात. समाजाला कडकरीतीने न शिकविता गोड शब्दांनी आंजारून, गोंजारून शिकविले तर त्याचा परिणाम चिरकाल टिकेल हे त्यांच्या पुरतेपणी मनात ठसले होते. या त्यांच्या स्वतंत्र विचाराने 'करमणूक' प्रेरित झालेले होते.
काशीताई कानिटकरांनाही हरिभाऊंनी आबालबद्ध 'करमणूक' सारखाच घेतील व असा पेपर असल्यावर कंपनीच्या कामास प्रसिद्धी हा हा म्हणता मिळेल, असे लिहून कळविले होते. समाजहिताविषयी सर्वसामान्य लोकांच्या ठिकाणी उत्सुकता निर्माण करण्याचे दुष्कर कार्य करमणुकीच्या माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट हरिभाऊंनी बाळगले होते. नवीन सुधारकांच्या पंथाचे तत्त्वज्ञान सामान्यजनास समजावून देऊन त्यास उन्नतीच्या मार्गाकडे नेण्याचे कार्य त्यांना करावयाचे होते. त्यांच्या या संकल्पाची 'करमणूक'च्या जन्माने सिद्धी झाली.
'करमणूक' प्रारंभीचे सुभाषित-अंकाच्या शिरोभागी काहिसा दुर्बोध खालील श्लोक छापलेला असे. ही प्रथा अखेरच्या अंकापर्यंत चालू होती -
"वदन्तु कतिचिद्धठारखफछटेति वर्णच्छटान् -
घटः पटश्तीतरे पटु रटन्तु वाक्यारवात् ।
वयं बकुल मंजरी गलदलीन माध्वी झरी
धुरीम परीतिभिर्मतिमभिः प्रमोदामहे ॥१॥"
या श्लोकाचा संदर्भ दिलेला नसून त्यात काही मुद्रण दोषही आढळतात. मुळात सुभाषितरत्न भागुमिरम् । सामान्य विप्रशंसा पान ३४, श्लोक ४९ मध्ये दिल्याप्रमाणे 'छटेति' ऐवजी 'छठेति' व 'वर्णच्छटा' ऐवजी 'वर्णाच्छठा' 'गलदलीन' ऐवजी 'गलदमवलीन' 'भणतिभि' ऐवजी 'भणितिभिः' पाहिजे. त्याचा अन्वय खालीलप्रमाणे लावता येईल.
'कतिचित् हठात् खफछठ इति वदन्तु
इतरे वाकपाखात घटपट इति