घटु स्टन्तु वयं बकुल मंजरी गलदमन्द लीन माध्वी झरी धुरीण पदरीतिभिः भणितिभः प्रमोदामहे ।।
त्याचा अर्थ-
'काही लोक आग्रहपूर्वक खफछठ असे वर्णोच्चार भले करोत, आणखी अन्य कोणी आपल्या वाक्च़ातुर्याने घटपट इत्यादी चातुर्याने बोलोत, परंतु आम्ही मात्र बकुळ मंजिरीमधून गळणाऱ्या मकरंदाच्या स्त्रावाने भरलेल्या अशा पद पद्धतीने-पूर्ण वाक्यानेच आनंदित होतो.'
तात्पर्य लालित्यपूर्ण मधुर आणि रसाळ भाषणाने-वाणीने आम्हाला आनंद होतो असे हरिभाऊंनी 'करमणूक 'चे ब्रीद्र पाळले आहे.
वैयाकरणी अथवा वैय्यायिकापेक्षा येथे खऱ्या रसिकाची भूमिका महत्त्वाची आहे.
आज विनोदी मनोरंजन व ज्ञानासाठी नियतकालिके काढणाऱ्या संपादकांना हरिभाऊंनी सांगितलेली उद्दिष्टे उद्ब़ोधक व अभ्यासनीय ठरवतील अशीच आहेत.
करमणूकचे अंतरंग-
'करमणूक' पत्राचा उद्देश सांगतानाच करमणुकीचे अंतरंग काय राहील याची कल्पना संपादकांनी वाचकांच्या माहितीसाठी जाहीर केली होती. त्यांनी करमणुकीत येणाऱ्या मजकुराची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे.
१. आळीपाळीने दोन मोठाल्या गोष्टी. (या गोष्टी एका वर्षातच संपतील.)
२. दोन बार अंकात संपणाऱ्या अशा लहान चटकदार गोष्टी.
३. पदार्थ विज्ञान, रसायन, अर्थ, शरीर, इत्यादी शास्त्रांचे ज्ञान करून देणाऱ्या गोष्टी.
४. नाटके इत्यादि.
५. वर्तमानसार (हे बहुतकरून नेहमी येईल.)
६. चटकदार चुटके व नकला ह्या तर नेहमी असावयाच्याच.
७. थोर पुरुषांची चरित्रे.
८. रम्यस्थलांची व प्रवासासंबंधी वर्णन.
९. निरनिराळ्या खेळांविषयी माहिती.