पान:'हरिभाऊं'चे साप्ताहिक करमणूक.pdf/19

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६
करमणूक : वाङ्म़यीन अभ्यास
 

१०. उपयुक्त माहिती.
११. कविता (दर अंकात बहुत करून येतील.)
१२. चुलीपासल्या गोष्टी. (या सदराखाली स्त्रियांस उपयुक्त माहिती येईल.)

 एका वर्षात प्रारंभ केलेली प्रकरणे त्या वर्षातल्या त्या वर्षात संपविण्याविषयी सक्त खबरदारी ठेविली जाईल, म्हणजे वर्षांचे पुस्तक बांधविण्यास ठीक पडेल.

(करमणूक दि. १ नोव्हे. १८९०, पान १०)

 'करमणूक'च्या शुभारंभापासूनच हरि नारायण आपट्यांच्या सुविख्यात 'पण लक्षात कोण घेतो' या कादंबरीचे लेखांक सुरू झाले. त्याचप्रमाणे प्रेसिडेंट ग्राफिल्डचे चरित्र, आठवडयातील गप्पा गोष्टी, विनोदपूर्ण चुटके, कविता, उपयुक्त माहिती, वर्तमानसार, ज्योतिषशास्त्र इत्यादी विषयांवरील भरगच्च मजकूर येत राहिला. प्रारंभीला दिलेले आश्वासन शेवटपर्यंत संपादकानी काटेकोरपणे निभावले. सर्वांनी एकत्र सहकुटुंब आबालवृद्धाने वाचावे असेच लेखन. उदा. 'थोडक्यात पुष्कळ', आश्चर्य जपानी','इकडे तिकडे','गोविंदरावांची पत्रे','वर्तमानसार','विनोदी चुटके ', : येथील हालचाल', 'चमत्कारिक माहिती','तऱ्हेतऱ्हेच्या - नानातऱ्हेच्या देशोदेशीच्या बातम्या','कूट प्रश्न','उपयुक्त माहिती','ज्ञानाचे कण',' मधुरवचने ',' स्फुट गोष्टी', 'सगुणाबाईची पत्रे' या विविध सदरांतून करमणुकीचे प्रसिद्ध केले. यात सर्वांच्या सुविधा होत्या हे या सदरांच्या नावातूनही कळते. वाचकांची उत्तम नाडी संपादकांनी आणली आणि निर्भेळ करमणुकीचा हेतू समोर ठेऊन 'करमणुक'चे हे असे अंतरंग साकार केले. वर्षाखेरी काही अंकातून विषयाची जंत्री दिली आहे. आणि जाणकार समीक्षक रसिकांचे अभिप्रायही छापले आहेत. काहीवेळा मधूनमधून अंकाच्या पहिल्या पानावर विषयानुक्रमणिका दिली आहे. पण त्यात सातत्य आढळत नाही.

 करमणूकीने निर्मळ मनोरंजनाबरोबर वाचकांच्या ज्ञानात भर टाकण्याचा आटोकाट यत्न केला. विचारांना चालना दिली आणि मनोवृत्तींना उन्नती तत्पर करण्याचा प्रयत्न केला. विचारांना नित्यशः मिळणाऱ्या माध्वी झरीत मादकता नसून विचार प्रवर्तकता असे तिने बुद्धीला मालिन्य आणण्याऐवजी अंत:करणाला शुद्ध येईल आणि दृष्टीवर मोहपटल निर्माण होण्याऐवजी अंत:परीक्षणाने जागृती घडून येईल. रसिकता आणि सर्वच क्षेत्रात आपण स्वतः जागे व्हावे, इतरांना जागे करावे.' अशी भूमिका 'करमणूक ' पत्राची होती.

 कविवर्य श्री. नारायण मुरलीधर गुप्ते यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली करमणुकीतुन प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९९१ पर्यंत त्यांनी आणखी ८-१० कविता लिहिल्या, असा उल्लेख 'विश्रब्ध शारदेत' आला आहे. (पान ३९५)